राज्यातील जातीवाचक वस्त्यांची नावे बदलणार - मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

 राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठक क्र. ४६ मध्ये दि.०२-१२-२०२० रोजी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            काही वस्त्यांची नावे महारवाडा, बोध्द्वाडा, मांगवाडा,ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळीगल्ली अश्या स्वरुपाची नावे आहेत.हि बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याच्या दृष्टीने हि नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील.

            यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करून त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.

         मा. राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र ई.मध्ये  "दलित" शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत "Scheduled Caste  & Nav Bouddha" आणि मराठी भाषेत "अनुसूचित जाती व नव बौध्द" या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

        सदरचा निर्णय  मंत्रिमंडळ बैठक क्र.४६ मध्ये दि.०२-१२-२०२० रोजी झाला आहे.

अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1sheYrgnYdLHY_fRReIkGeFLSwEoSRfvs/view?usp=sharing

                                         टीम - प्राकृत फूड्स 
==============================================================

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन  निघणारे परिपत्रकांची माहिती मिळवण्यासाठी 

वरील माध्यमातून दररोजच्या ताज्या घडामोडी मिळावा.

============================================================== 


Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group