शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) नियम, १९६१ मधील तरतुदीच्या अधीन राहून आकस्मिक उद्भवणाऱ्या २८ आजारांवर खासगी रुग्णालयात घेतलेल्या वैद्यकीय खर्चाची वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयांमधील तरतुदींच्या आधीन राहून रु. ४०००० पर्यंतच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती मुंजुरीचे अधिकार सबंधित विभाग प्रमुखांना प्रदान करण्यात आलेले आहेत. व ४०००० वरील वैद्यकीय खर्चाच्या प्रतीपुर्तीच्या प्रकरणांना निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देण्यात येत आहेत.
खासगी रुग्णालयातील वास्तव्यावरील खर्चाची प्रतिपूर्ती
- सर्वसामान्य कक्ष (जनरल वार्ड) - प्रत्यक्ष खर्चाच्या सरसकट ९५ %
- सर्वसामान्य कक्षाच्या बाजूचा बाथरूम नसलेला कक्ष - प्रत्यक्ष खर्चाच्या सरसकट ९० %
- बाथरूमसह स्वतंत्र कक्ष - प्रत्यक्ष खर्चाच्या सरसकट ७५ %
- बाथरूमसह डबल बेडेड कक्ष - प्रत्यक्ष खर्चाच्या सरसकट ७५ %
- बाथरूमसह वातानुकुलीत कक्ष - प्रत्यक्ष खर्चाच्या सरसकट ७५ %
- अतिदक्षता कक्ष (ICU) - १०० %
शासन विर्निदीष्ट २७ आकस्मिक व ५ गंभीर आजारांची यादी
- हृदयविकाराचा झटका (Cardlac emergency), प्रमस्तिक संहनी (cerabral vascular) फुफुसाच्या विकाराचा झटका (pulmonary emergency), अन्जिओग्राफ़ि चाचणी
- अति रक्तदाब (Hypertension)
- धनुर्वात (Titanus)
- घटसर्प (Dlphtheria)
- अपघात (Accident), आघात संलक्षण (Shock syndrome) हृदयाशी आणि रक्तवाहिन्याशि संबंधित (Cardiological and vascular)
- गर्भपात (Abortions)
- तीव्र उदर वेदना / आंत्र अवरोध (Acute abdominal pains/Intestinal obstruction)
- जोरदार रक्तस्राव (Severe haemorrhage)
- गॅस्ट्रो-एन्ट्रायटीस (Gastro-Entrietis)
- विषमज्वर(Typhoid)
- निश्चतेनावस्था (Coma)
- मनोविकृतीची सुरुवात (Onset of psychiatric disorder)
- डोळ्यातील दृष्टीपटल सरकणे (Retinal detachment in the eye)
- स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार (Gynaecological and obstetric emergency)
- जननमुत्र आकस्मिक आजार (Genito - urinary emergency)
- वायू कोथ (Gas Gangrino)
- कान,नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार (foreign body in ear, nose or throat emergency)
- ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती (Cogenital Anamolies requiring argent surgical intervention )
- ब्रेन ट्युमर (Brain Tumour)
- भाजणे (Burns)
- इपिलेप्सी (Epilepsy)
- अक्युट ग्लकोमा (Acute Glaucoma)
- स्पायपनस स्कॉड (मज्जारज्जू) संबंधात आकस्मिक आजार
- उष्माघात
- रक्तासंबंधातील आजारप्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
- प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
- रसायनामुळे होणारी विषबाधा
- कोविड - १९
गंभीर आजार भाग - २
- हृदय शस्त्रक्रियांची प्रकरणे (Heart Surgery)
- हृद्य उपमार्ग शस्त्रक्रिया (Bye pass Surgery)
- अन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया
- मूत्रपिंड प्रतीरोपण शस्त्रक्रिया (Kidney Transplantation)
- रक्ताचा कर्करोग (Blood Cancer)
अधिकृत परिपत्रके डाऊनलोड करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करावा
सदर शासन परिपत्रक ( सार्वजनिक आरोग्य विभाग ) महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी काढलेले आहेत.
दि. २९ जुलै १९९९
दि. १९ मार्च २००५
दि. १७ डिसेंबर २०२०
टीम - प्राकृत फूड्स
==============================================================
महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.
धन्यवाद.....
टिप्पण्या