१. युरिया (४० कि.ग्र) + १०:२६:२६ (११५ कि.ग्र) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५कि.ग्र)
२. युरिया (६५कि.ग्र) + सिंगल सुपर फॉस्फेट (३७५कि.ग्र) + म्युरेट ऑफ पोटश (५० कि.ग्र)
३. १०:१५:१५ (२०० कि.ग्र) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ कि.ग्र)
४. १८:१८:१० (१६६ कि.ग्र) + सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ कि.ग्र) + म्युरेट ऑफ पोटश (२३:33 कि.ग्र)
आंतर मशागत :
- पिक १५ ते २० दिवसाचे असताना पहिली कोळपणी
- पिक ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी
- त्यानंतर एक खुरपणी (निंदणी) करून शेत तणविरहीत ठेवावे.
- सोयाबीनला फुले लागल्यास कोळपणी करू नये. ( अन्यथा सोयाबीनच्या मुळा तुटून नुकसान होते.)
पाण्याचे नियोजन :
- पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी.
- तापमान कमी असल्यास उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागू शकतात.
- चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे.
- पिक पेरणी ते काढणी या कालावधीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० पाणी पाळ्याची आवश्यकता आहे.
- सोयाबीनमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याच्या ताणास संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे.
भेसळ काढणे
सोयाबीन पिकामध्ये झाडांची उंची,पानांचा आकार, झाडावरील लव, पान, खोड व फुलांचा रंग ई. लक्षणांनुसार भेसळ ओळखून नष्ट करावी.
पिक संरक्षण :
उन्हाळी सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी आळी, घाटेअळी, वाटण्यावरील शेंगा पोखरणारी अळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे ई.किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
सदर किडींच्या नियंत्रणासाठी
प्रोफेनोफॉस ५० ईसी (२० मिली)
किंवा
लंबडा सायहालोथ्रीन ४.९ सी.एस (६ मिली)
किंवा
थायमीथोक्झाम १२.६० % + लंबडा सायहालोथ्रीन ९.५ सी.एस (२.५ मिली)
किंवा
क्लोरट्रानीलोप्रोल १८.५ एस सी (३ मिली)
वरील पैकी एका कीटकनाशकाचा वापर करावा.
सदर कीटकनाशकांचे प्रमाण हे १० लिटर पाणी (साधा पंप) यासाठी असून पॉवर स्प्रे साठी कीटकनाशकाची मात्रा तीनपट करावी.
- उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही, परंतु "येलो व्हेन मोझोक" या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- प्रादुर्भाव ग्रस्त झाडे आढळून आल्यास तीउपटून नष्ट करावी.
- पांढऱ्यामाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.
- त्यासाठी थायमिथोक्झाम १२.६० % + लंबडा सायहालोथ्रीन ९.५ सी.एस (२.५ मिली) फवारावे.
काढणी व मळणी :
- शेंगा पिवळ्या पडून पक्व होताच पिकाची काढणी करावी.
- कापणी नंतर पिकाचे छोटे छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून मळणी यंत्राची गती कमी करून मळणी करावी.
- बियाण्याच्या बाह्य आवरणाला ईजा पोहचणार नाही याकडे लक्ष्य द्यावे.
- बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण १३ % पर्यंत असल्यास मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती ३००ते ४०० फेरे प्रती मिनिट करावी.
- बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण १४ % पर्यंत असल्यास मळणी यंत्राच्या फेऱ्यांची गती ४००ते ५०० फेरे प्रती मिनिट करावी.
- उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाण्याचा रंग पिवळसर हिरवट असतो.
साठवण :
- मळणी नंतर बियाणे ताडपत्री / सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरवून घ्यावे.
- बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण १० ते १२ % पर्यंत आणावे.
- बियाणे स्वच्छ करून पोत्यात साठवणूक करावी.
- साठवणुकीचे ठिकाण थंड, ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे.
- साठवण करताना एकावर एक चार पेक्षा जास्त पोती ठेवू नये.
उत्पादन :
उन्हाळी सोयाबीनचे एकरी ३ ते ५ क्विंटल पर्यत सरासरी उत्पादन येवू शकते.
टिप :
- उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामासारखे होत नाही.
- दाण्याचा आकार लहान असतो.
- उन्हाळी सोयाबीनचा हंगाम फक्त घरच्याघरी बिजोत्पादन करण्यासाठी चांगला आहे.
लेखक
डॉ. एस.पी.म्हेत्रे - ७५८८१५६२१०
(प्रभारी अधिकारी, सोयाबीन संशोधन योजना, वनामकृवि, परभणी)
डॉ.आर.एस.जाधव -
(सहाय्यक प्राध्यापक, (कीटकशास्त्र ), सोयाबीन संशोधन योजना, वनामकृवि, परभणी)
श्री व्ही.आर.घुगे - ७५८८१५६२१३
(सहाय्यक प्राध्यापक, (कीटकशास्त्र ), सोयाबीन संशोधन योजना, वनामकृवि, परभणी)
टिप्पण्या