Featured post

शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026

इमेज
शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026 📢 महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाने 02 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शाळांच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय विशेषतः Self-Financed Schools (स्वयंअर्थसहाय्ययत शाळा) साठी लागू आहे. :contentReference[oaicite:0]{index=0} 📚 शासन निर्णय का घेतला? अनेक शाळा “International”, “Global”, “World” असे शब्द वापरत होत्या पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती प्रत्यक्षात त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्हत्या शुल्क व गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होत होते 📌 नवीन नियम काय आहेत? नियम तपशील International / Global शब्द फक्त आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न शाळांनाच वापरता येतील CBSE / State Board शाळा या शब्दांचा वापर करता येणार नाही Convent शब्द फक्त ख्रिश्चन संस्थांनी चालवलेल्या शाळांसाठीच वापरता येईल Sainiki (सैनिकी) फक्त मान्यताप्राप्त सैनिक शाळांसाठी दिशाभूल करणारे श...

नाताळ (Christmas) सण शासनाच्या मार्गदर्शक सूचना २०२०


 दरवर्षी ख्रिच्क्षण बांधव नाताळाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात . परंतु कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी सर्व धर्मीय सण/ उत्सव हे अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहेत.
त्याच पद्धतीने ख्रिच्क्षण बांधवानी नाताळचा सण साजरा करणे अपेक्षित आहे.
नाताळ (Christmas) सण शासनाच्या मार्गदर्शक सूचना २०२०


त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

  1. नाताळ सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल याची काळजी घेण्यात यावी.
  2. चर्चमध्ये निर्जंतुकिकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनीटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष्य देणे आवश्यक आहे.
  3. नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशुंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी Social Distancing व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
  4. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतिगीत (Choir) गाण्यासाठी जास्तीत जास्त १० गायकांचा (Choiristers) समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईक चा वापर करून Social Distancing चे पालन करण्यात यावे.
  5. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने / स्टॉल लावण्यात येवू नयेत.
  6. ६० वर्षांवरील नागरिकांनी तसेच १० वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणेटाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची (Onlline Masses) सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.
  7. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे.
  8. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येवू नये.
  9. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येवू नये. ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.
  10. ३१ डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना (Thanks Giving Mass) हि मध्यरात्री आयोजित न करता संध्याकाळी ७.०० वाजता किंवा त्यापूर्वी घेण्याचे नियोजन करण्यात यावे.
  11. कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील.
  12. तसेच या परिपत्रकानंतर काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाने दि. २३ डिसेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२०१२२३११३३५८०६२९ असा आहे.

अधिकृत परिपत्रक  डाऊनलोड करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1capjCe75wx9DmAqk_3RYJYlPg8RBXtgp/view?usp=sharing

                                         टीम - प्राकृत फूड्स 
==============================================================

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन परिपत्रके,  निर्णय थेट  व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

 धन्यवाद.....

टिप्पण्या

Popular Posts

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर