Featured post

शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026

इमेज
शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026 📢 महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाने 02 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शाळांच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय विशेषतः Self-Financed Schools (स्वयंअर्थसहाय्ययत शाळा) साठी लागू आहे. :contentReference[oaicite:0]{index=0} 📚 शासन निर्णय का घेतला? अनेक शाळा “International”, “Global”, “World” असे शब्द वापरत होत्या पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती प्रत्यक्षात त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्हत्या शुल्क व गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होत होते 📌 नवीन नियम काय आहेत? नियम तपशील International / Global शब्द फक्त आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न शाळांनाच वापरता येतील CBSE / State Board शाळा या शब्दांचा वापर करता येणार नाही Convent शब्द फक्त ख्रिश्चन संस्थांनी चालवलेल्या शाळांसाठीच वापरता येईल Sainiki (सैनिकी) फक्त मान्यताप्राप्त सैनिक शाळांसाठी दिशाभूल करणारे श...

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावे | Students should fill up the scholarship application

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावे ( Students should fill up the scholarship application ) आयुक्त समाज कल्याण यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याचे  आव्हान केले आहे. शिष्यवृत्ती फोर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahadbt  या वेबसाईट वरून फार्म भरावे.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावे | Students should fill up the scholarship application



                                       या शैक्षणिक वर्षात कोविड - १९ मुळे शाळा / महाविद्यालये नियमितपणे सुरु झालेले नसले तरी नियमित पणे प्रवेश प्रक्रिया झाली व ऑनलाईन शिक्षण सुध्या सुरु झाले. तरी नियमित पाने शाळा महाविद्यालये सुरु झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्याची सूचना दरवर्षी प्रमाणे मिळणार नसल्यामुळे सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थी प्रतिनिधी व महाविद्यालयांना त्यांनी त्यांच्या स्तरावरून सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विविध पर्यायांचा वापर करून हि सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. कुठल्याही परिस्थितीत लाभार्थी विद्यार्थी शिष्वृत्ती पासून दुर्लक्षित राहू नये याची खबरदारी सुध्दा सर्वांनी घ्यावी. आवश्यकता असल्यास प्रसिधीपत्रके सुध्दा काढावीत.

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे संकेतस्थळ | Scholarship Application Website :

  https://mahadbtmahait.gov.in/

                              या शासनाच्या महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे सुद्धा आव्हान यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 
                          
                              महाडीबीटी संगणक प्रणाली वर विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे अर्ज अदयावत करणे तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज पुढील कार्यवाहीसाठी फॉरवर्ड करणे इत्यादी करता महाडीबीटी संगणक प्रणाली 3 डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आली आहे यावेळी शासनाने सर्व महाविद्यालयांना सुद्धा संबंधित सूचना केलेल्या आहेत तसेच महाविद्यालय स्तरावर सर्व प्रलंबित असलेले अर्ज अर्जांवर योग्य ती कार्यवाही सुद्धा करावी व शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये महाडीबीटी संगणक प्रणाली मध्ये काही अर्ज प्रलंबित राहिल्यास ना मंजूर करण्यात येतील याची सुद्धा नोंद घ्यावी. कालमर्यादेत त्यावर योग्य ती कार्यवाही महाविद्यालयांकडून होणे आवश्यक आहे .
                            उपरोक्त सूचनांचे पालन न केल्यास, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांची असेल याबाबतचा खुलासा सुद्धा सामाजिक न्याय विभागाने केलेला आहे याची कुठलीही जबाबदारी सामाजिक न्याय विभागावर असणार नाही याची सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी असे आवाहन शासनाकडून करण्यात आलेले आहेत. या वेळी शासनाने महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी व महाविद्यालयाने आपल्या स्तरावरून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या सूचना  विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून त्वरित कळवण्यात यावे असे सुद्धा जाहीर आव्हान केलेला आहे महाविद्यालयाच्या सूचनाफलकावर तसेच आवश्यकता असल्यास परिपत्रकाद्वारे प्रसिद्धी करण्यात यावी असेसुद्धा महाविद्यालयांना कळविण्यात आलेले आहे.


                            त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावे ( Students should fill up the scholarship application ) व यासाठी विद्यार्थ्यान पर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची माहिती पोहचावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यातून एक सुध्या विद्यार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी बाळगावी. 

सर्व विद्यार्थांपर्यंत हि माहिती पोहचण्यासाठी  हि पोस्ट  सर्व विद्यार्थ्यान पर्यंत शेयर करा.

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन निघणारे परिपत्रके,  व्हॉट्सऍप वर उपलब्ध मिळवण्यासाठी  खालील लिंक वर आपल्या जिल्हाचे नाव पाठवा.
 धन्यवाद.....

टिप्पण्या

Popular Posts

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर