त्यामुळे शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांना होऊ नये, या धारणेतून शाळा सुरु करणे विद्यार्थ्यांसाठी हितावह राहील. राज्यातील शाळा सुरु करण्यास सार्वजनिक आरोग्य विभाग सहमत आहे.
त्यानुसार राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग दिनांक २७ जानेवारी २०२० पासून सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. कोविड १९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे.
तसेच शालेय शिक्षण विभागाच्या दि. १५ जून २०२० , दि.२९ ऑक्टोबर २०२० तसेच दि. १० नोव्हेंबर २०२० या मागील परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. संबंधित जिल्हा परिषद / नगरपालिका / महानगरपालिका इत्यादींनी शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू होतील याची दक्षता घ्यावी.
मार्गदर्शक सूचना -
शाळा सुरु करण्यापूर्वी
आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या बाबत मार्गदर्शक सूचना :
- हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
- थर्मोमिटर, थर्मल स्कॅनर, प्लस ऑक्सिमीटर, जंतुनाशक साबण, पाणी ई. उपलब्ध करावे.
- शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण करावे.
- वर्गखोली तसेच स्टाफ रूम / वसतिगृहातील खोल्मयांधील बैठक व्यवस्था शारिरीक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी.
- वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.
- थुंकण्याचावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
- शारिरीक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात.
- परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व ई. तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल.
- शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात.
- विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल.
- विद्यार्थांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
- शाळेत दर्शनी भागावर Physical Distancing, मास्कचावापर ई. संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर्स / स्टिकर प्रदर्शित करावे.
- शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट शारिरीक अंतर राखले जाईल या करिता विशिष्ठ चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ ई. वापर गर्दी होण्याऱ्या ठिकाणी जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे ई. ठिकाणी करण्यात याव्यात.
शाळा सुरु झाल्यानंतर
आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या बाबत मार्गदर्शक सूचना :
- शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा.
- शाळेतील वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठ भाग जसे लचेस, अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टेबल, खुर्च्या ई. वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- शाळा परिसरातील कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावावी.
- हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हान्डवाश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी.
- स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेवू नये.
- विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची दररोज साधी आरोग्य चाचणी जसे Tharmal Screening घेण्यात यावी.
- विविध इयत्तांचे वर्ग सुरु व संपण्याच्या वेळामध्ये १० मि. अंतर असावे.
- ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी.
- शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे. ( ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व ५० टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी ) अशाप्रकारे एकाच दिवशी ५०टक्के विद्यार्थी अनलॉक वर्गात व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील.
- प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये.
२७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीच्या शाळाना सुरवात करण्यासंदर्भातील शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२१०११८१२३७०६९१२१ आहे.
१. दि. १८ जानेवारी २०२० - Download GR
२. दि. १० नोव्हेंबर २०२० - Download GR
३. दि. २९ ऑक्टोबर २०२० - Download GR
४. दि. १५ जुन २०२० - Download GR
