तुती रेशीम पिकास कृषी पीक म्हणून मान्यता

रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे.


तुती रेशीम पिकास कृषी पीक म्हणून मान्यता



 महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पूरक आहे अलीकडील काळात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे शेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी रेशीम उद्योगाची हमखास मदत होऊ शकते. महाराष्ट्र राज्य अपारंपारिक राज्यामध्ये आघाडीवर असून राज्यात तुती सर अशा दोन प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतले जाते.
                                       राज्यात तुती रेशीम चे एकूण 27 जिल्ह्यात उत्पादन घेतले जाते तसेच रेशमाचे उत्पादन नागपूर विभागातील प्रमुख्याने गडचिरोली भंडारा गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यात अधिक प्रमाणात घेतले जाते सहकार व पणन विभागाकडून महाराष्ट्र  शासनाच्या तरतुदीनुसार रेशीम कोष शेती उपजाचे अनुसूची मध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असून नियोजन विभागाने तुतीस वृक्षाचा दर्जा दिला आहे.
                                                     त्याच प्रमाणे कृषी विभागामार्फत कृषी विद्यापीठांमध्ये रेशीम किडे शास्त्राचा समावेश करण्यात आला असून कृषी विद्यापीठांमध्ये हा विषय व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून शिकवला जातो रेशीम उद्योग शेतीपुरक उद्योग आहेत रेशीम लागवडीसाठी अंतर मशागत करणे खतपाणी घालण्यात आला खाऊ घालून त्यापासून रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन त्याची विक्री करणे त्यावर प्रक्रिया करून त्यापासून कापसापासून धागा तयार करणे व धाग्यापासून कापड तयार करणे इत्यादी कामे करावी लागतात.
                                    पावसाचे प्रमाण कमी असलेल्या प्रदेशात येतो तिचे उत्पादन चांगली येत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी तुती लागवड फायदेशीर ठरत आहे त्यामुळे दिवसेंदिवस राज्यातील तुती लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे तथापि रेशीम कोशाचा इतर पिकांप्रमाणे कृषी पिकांमध्ये समावेश नसल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना इतर कृषी पिकांसाठी लागू असलेल्या योजनांचा लाभ होत नाही, परिणामी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांपासून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते या पार्श्वभूमीवर रेशीम पिकास कृषी पीक म्हणून मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

 तुती रेशीम पिकास कृषी पीक म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे.

                  सदर चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202101111608150601 असा आहे. 

GR Download


प्राकृत इन्फो चे व्हाट्सएपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. 




Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group