उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार- २०२० साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 माहिती व जनसंपर्क महासंचानलया मार्फत उत्कृष्ठ पत्रकारिता, उत्कृष्ठ लेखन, उत्कृष्ठ दूरचित्रवाणी, वृत्तकथा, उत्कृष्ठ छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे / वृत्कथा/ यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२०

पुरस्कारांचे स्वरूप : ५१ हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) 

राज्यस्तरीय पुरस्कारांची यादी :

  1. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी)
  2. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) 
  3. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी)
  4. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू)
  5. यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क)
  6. पु.ल.देशपांडे उत्कृष्ठ दूरचित्रवाणी वृतकथा पुरस्कार 
  7. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार
  8. केकी मूस उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क)
  9. समाज माध्यम पुरस्कार 
  10. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
  11. पत्रकार सुधाकर डोइफोडे अग्रलेखन पुरस्कार 


विभाग स्तरीय  पुरस्कारांची यादी:

  1. दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग)
  2. अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद आणि लातूर विभाग)
  3. आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग)
  4. नानासाहेब परुळेकर पुरस्कार (पुणे विभाग)
  5. शि.म.परांजपे पुरस्कार (कोकण विभाग)
  6. ग.गो.जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग)
  7. लोकनायक बापुजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग)
  8. ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग)

नियम व अटी

  1. पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील ५ वर्षाची कामगिरी पहिली जाईल.
  2. सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी केलेले प्रयत्न 
  3. पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांच्या कामगिरीचा विचार केला जाईल.
  4. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
  5. उत्कृष्ठ लेखन पुरस्कारासाठी पाठवायच्याप्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या २ प्रतीसह पाठवावे लागेल.
  6. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रानांसोबत त्याच्या २ प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल.
  7. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
  8. पत्रकारांच्या तसेच छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
  9. अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक,पुणे,कोल्हापूर,कोकण, विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात.
  10. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनाच्या शिफारस पत्राची आवश्यकता नाही.
  11. जे पत्रकार ज्या विभागात वास्तव करीत असतील त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह धरण्यात येईल.
  12. गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत सहभाग घेता येईल.
  13. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ३२ येथे पाठविता येतील.
  14. शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठवण्याची मुभा राहील.
  15. २०२० या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्दझालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
  16. प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा.
  17. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
  18. प्रत्येक गट व भाषेसाठी संबधित पत्रकारांनी एकाच प्रवेशिका पाठवावी. 


अधिकृत परिपत्रक व पुरस्काराचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा


                                        टीम - प्राकृत फूड्स 

==============================================================

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

 धन्यवाद.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर

इ. 1 ली ते 8 वी विद्यार्थ्यांना मोफत दप्तर योजना 2026 | ₹165 कोटी मंजूर – शासन निर्णय