शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026
शासनाद्वारे थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेवर भर देण्याच्या धोरणास अनुसरून नियोजन विभागाने नमूद केलेल्या वस्तूंची खरेदी करून पुरवठा न करता थेट निधी लाभार्थ्याना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यास अनुसरून आश्रमशाळेतील विद्यार्थांना काही वस्तू थेट निधी बँक खात्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थांना यापुढे शासनामार्फत खालील वस्तू खरेदी करून उपलब्ध करून न देता त्याएवजी थेट अनुदान विद्यार्थी/पालक यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थांचे / पालकांचे बँक खाते उघडून त्यास आधार क्रमांक संलग्न करण्यात यावा.
थेट लाभ द्यावयाच्या वस्तू
आयुत, आदिवासी विकास प्रत्येक शेक्षणिक
वर्षासाठी वर्गनिहाय विद्यार्थांना खरेदी करावयाच्या वस्तूंचे परिमाण व संख्या
निश्चित करून वस्तुनिहाय खरेदी किमत निश्चित करतील. खरेदी किमंत निश्चित करताना त्या
वस्तूच्या निश्चित परिमाणानुसार बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रंन्डेड वस्तूच्या
किरकोळ विक्री किमतीचा (MRP) आधार घेवून त्यानुसार वस्तूची किमत निश्चित करावी.
विद्यार्थांना देय रक्कम दि. १ जून ते १० जूनदरम्यान विद्यार्थांच्या / पालकांच्या
खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना विद्यार्थी
उन्हाळ्याच्यासुटीवर जाताना विद्यार्थांना वर्ग निहाय कोणत्या वस्तूंसाठी रक्कम
मिळाली आहे त्यावस्तुंचे परिणाम व संख्या यांची यादी विद्यार्थी व पालकांना
मुख्याध्यापकाकडून उपलब्ध करून देण्यात येईल.
टिप्पण्या