मुलांना मिळणार मोफत चष्मे - शासनाची नवी योजना
महाराष्ट्रामध्ये शालेय मुलांना मोफत नेत्र तपासणी करून दृष्टीदोष असणाऱ्या मुलांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत. शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 6 ते 18 वयोगटातील सर्व शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करून त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या जन्मतः व्यंग, आजार , जीवनसत्त्वांची कमतरता व अपंगत्व याचे निदान करून वेळेवर उपचार केले जातात. यासाठी महाराष्ट्र राज्यात १९९५ वैद्यकीय पथके स्थापन कर्ली असून त्यांचे तपासणी कार्यक्रमाचे वेळापत्रक शालेय शिक्षण व महिला व बाल विकास विभाग विभागाच्या समन्वयाने तयार करण्यात येतात.
शालेय मुलांमध्ये दृष्टिदोष याचे प्रमाण 8 टक्के एवढे असल्याचे दिसून येते अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जात होती परंतु सर्व गरजू विद्यार्थ्यांना चष्मे पुरवणे शक्य होत नाही सदर तपासण्यांमध्ये असे आढळून आले आहे की राज्यातील शालेय मुलांमध्ये दृष्टीदोष याचे प्रमाण अधिक असून त्यामुळे मुलांच्या वाचन लेखन व अभ्यास इत्यादी परिणाम होत आहेत सर्व मुलांमध्ये दृष्टिदोष याचे वेळीच निदान करून त्यांना तत्परतेने योग्यतेचे उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शैक्षणिक विविध सुधारणा होऊन ते सुशिक्षित व सक्षम नागरिक म्हणून विकसित होतील. महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शासकीय शाळां मधल्या 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या दृष्टी दोष निवारणासाठी मुलांचे नेत्र तपासणी करून दृष्टिदोषाचे निदान करून त्यांना मोफत चष्मे उपलब्ध केल्यास त्यांच्या शैक्षणिक गतीविधीमध्ये अडथळा येणार नाही त्या दृष्टीने राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून शास्त्रीय पद्धतीने प्रमाणित केल्यानुसार त्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सदर कार्यक्रमा राज्य शासनाची नवीन योजना म्हणून राबवण्यासाठी पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
योजनेचे नाव :
शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविणे
योजनेचे उद्देश
- महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शासकीय शाळां मधल्या 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या दृष्टी दोष निवारणासाठी मुलांचे नेत्र तपासणी करणे.
- दृष्टिदोष असलेल्या मुलांना चष्मे मोफत पुरविणे.
- सदर मुलांच्या दृष्टिदोषाच्या दरवर्षी पाठपुरावा करून आढावा घेण्यात येईल.
योजनेची अंमलबजावणी
- राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या 1995 वैद्यकीय पथकामार्फत सर्व शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाईल.
- दृष्टिदोष असल्याचे दिसून आलेल्या मुलांचे त्यांच्या शाळेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत निदान निश्चित केले जाईल.
- सार्वजनिक आरोग्य विभागात मार्फत नेत्र सहायकांच्या शाळा भेटीचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.
- चष्म्याच्या पुरवठ्यासाठी शासनाच्या प्रचलित खरेदी धोरणानुसार पुरवठादार निश्चित केला जाईल.
- नेत्र सहायकाने तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणित केलेल्या चष्म्याची विद्यार्थि निहाय यादी पुरवठादार सादर करण्यात येईल.
- सदर पुरवठादार संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी अथवा शाळेत कुरियर द्वारे विद्यार्थ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्रमांकाचा चष्मा पाठवील.
- विद्यार्थाला प्राप्त झालेल्या चष्मा वैद्यकीय दृष्ट्या योग्य आहे किंवा नाही याची खातरजमा संबंधित नेत्रासहायक करेल.
- लाभार्थ्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित नेत्र साहाय्य कांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
- ज्या शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुढील वर्षाच्या तपासणी चष्म्याचा नंबर बदलला असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून येईल अशा विद्यार्थ्यांची योग्य ती नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात यावे
- विद्यार्थ्यांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती व सल्ला दिला जाईल.
मुलांना मोफत चष्मे पुरवठा योजना 2020-21 या वर्षापासून अंमलात येईल.
शासनाच्या योजनेचे परिपत्रक पाहण्यासाठी

टिप्पण्या