शिवजयंती २०२१ मार्गदर्शक सूचना | ShivJayanti 2021 Guidelines | PRAKRUT INFO

महराष्ट्रामध्ये शिवजयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा हा एक मोठा सण आहे.  मराठी माणसाला शिवजयंती म्हटलं की अतिशय आनंद उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण होतो. शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते.



                       मागील वर्षीपासून सुरू असलेल्या कोविड -१९ मुळे महाराष्ट्रात विविध जयंती, सण अतिशय साधेपणाने आणि मर्यादित संख्येमध्ये व शक्यतो ऑनलाइन पद्धतीने साजरे केले जात आहेत. पण आपण पाहत आहोत की मागील चार महिन्यापासून अनेक गोष्टी या मोकळेपणाने करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. जनसामान्यांचे जनजीवनही पूर्णपणे मोकळे झालेले आहे. आपण बघतो की सध्या विविध पक्षांचे, संघटनांचे महाराष्ट्रात मेळावे सुरू आहेत. विधान परिषदेच्या निवडणुका असतील पश्चिम बंगाल मधील  निवडणुका असतील तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतच्या निवडणुका सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला महाराष्ट्रात झालेल्या दिसल्या आणि या सर्व घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणावर मेळावे झाले एकत्रीकरण संपन्न झाले. 
                     त्यामुळे मागील काही दिवसांपासून शिवभक्तांनी शिवजयंती हि अतिशय उत्साहपूर्ण व दरवर्षीपेक्षा वेगळेपणाने व मोठ्या प्रमाणावर करण्याचे ठरवले होते. त्या मागील कारण असे कि, अनेक उत्सव मागील वर्षभरात न झाल्यामुळे शिवजयंती अतिशय मोठ्या प्रमाणावर करण्याचे ठरवले होते व त्याप्रमाणे नियोजन सुद्धा शिवभक्तांनी केलेले आहे अनेक ठिकाणी आपण बघतो की मोठमोठे मेळावे, मोठमोठे व्याख्याने, मोटरसायकल फेरी, आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिर असतील असे सर्व कार्यक्रम व त्यांच्यासाठी लागणारी तयारी सुध्दा सगळीकडे करण्यात आली असून कार्यक्रमांचे निश्चितीकरण झालेले आहे.




पण मागील काही दिवसापासून आपण पाहतो कि, कोविड - १९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच दिनांक 11 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२१  रोजीचा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिलेली आहे.

या परिपत्रकात काय म्हटले आहे ते पाहू...
  1. कोविड - १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिवजयंती मोठ्या प्रमाणावर एकत्र न येता साधेपणाने साजरी करावी,
  2. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू नये.
  3. त्याऐवजी सदर कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण करावे.
  4. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक फेरी, मिरवणुका काढण्यात येवू नयेत.
  5. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचे कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करावे.
  6. सदरील कार्यक्रम देखील १०० व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
  7. त्याचबरोबर, संख्येची व सामाजिक अंतर पाळून आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करता येईल. ( उदा. रक्तदान शिबीर व कोरोना, मलेरिया, डेंग्यू ई. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती )
Download ShivJayanti 2021 Guidelines GR 1


शिवजयंती २०२१ मार्गदर्शक सूचना | ShivJayanti 2021 Guidelines | PRAKRUT INFO

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर

इ. 1 ली ते 8 वी विद्यार्थ्यांना मोफत दप्तर योजना 2026 | ₹165 कोटी मंजूर – शासन निर्णय