महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च | Maharashtra Budget Convention March 1 to 10 | PRAKRUT INFO

२०२१ अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी :

 सोमवार दि. ०१ - १० मार्च २०२१

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन  १ ते १० मार्च  | Maharashtra Budget Convention March 1 to 10 | PRAKRUT INFO


२०२१ अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थळ : 

विधान भवन, मुंबई 

२०२१ अर्थसंकल्प सादर करण्याचा दिनांक

सोमवार दि. ८ मार्च २०२१




अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज २०२१ पुढीलप्रमाणे :

  1. १ मार्च - राज्यपालांच्या दोन्ही सभागृहात दिलेल्या भाषणानंतर अधिवेशनाला  सुरुवात
  2. १ मार्च  -  सरकार पुरवणी मागणी मांडेल
  3. २ मार्च - राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल
  4. ३ - ४ मार्च - पुरवणी मागण्यांवरील चर्चेसाठी राखीव ठेवण्यात येईल
  5. ५ मार्च - विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल आणि काही बिलेही सादर केली जातील.
  6. ६ - ७ मार्च - शनिवार व रविवार मुळे कामकाज बंद राहील
  7. ८ मार्च - अर्थसंकल्प सादर केला जाईल
  8. ९ - १० मार्च - अर्थसंकल्पावर चर्चा होईल आणि विनियोग विधेयक मंजूर होईल

 विधान भवनात कोविड-१९ (कोरोना) विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता :

  • विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
  • यासाठी दि. २७ व २८ फेब्रुवारी, २०२१ रोजी तसेच पुढील आठवड्याच्या शनिवार व रविवारी विधान भवन, मुंबई येथे यासंदर्भात कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. 
  • तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत कोविड-१९ (कोरोना) विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता विधान भवनात दि. ०१ मार्च, २०२१ रोजी पासून निगेटिव्ह प्रेशर सिस्टम कार्यान्वित करण्यात येणार आहे.
  • एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे बैठक व्यवस्था 
  • प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था 
  • सभागृहामध्ये विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी यु.जी.यंत्रणा, ओझोन यंत्रणा, सॅनिटायझेशन कोटींग प्रवेशद्वाराच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग या सारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
  • तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस सिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सेनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहेत

विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेशा संबंधी सूचना :

  • मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश
  •  खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही.
  •  मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांना देखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे.
त्याचसोबत खालील व्यक्तींची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे.

  • विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक
  • वाहन चालक
  • सुरक्षा रक्षक 

.

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न :

  •  विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
  •  उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
  •  उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
  •  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  •  उपमुख्यमंत्री अजित पवार
  •  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
  •  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
  •  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
  •  संसदीय कार्यमंत्री अनिल परब
  •  मंत्रीमंडळातील सदस्य
  •  विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य
  •  विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीचे सदस्य
  •  संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत 

अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज दिनदर्शिकेवर यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करून या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. 

💬 Join Free WhatsApp Group