होळी धुलीवंदन व रंगपंचमी 2021 मार्गदर्शक सूचना | holi dhulivandan v rangpachmi margdarshak suchna 2021 | PRAKRUT INFO

राज्यात यावर्षी सर्वधर्मीय सण व उत्सव  मोठ्या स्वरूपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये कोविड १९ रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोविड१९ चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित न येता उत्सव साजरा करणे उचित होणार आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी होळी धुलीवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.


  • होळी धुलीवंदन व रंगपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठा प्रमाणावर साजरा केला जातो.
होळी -  दिनांक 28 मार्च 2021 रोजी 
धुलीवंदन - दिनांक 19 मार्च 2019 रोजी 
रंगपंचमी - दि. 2 एप्रिल 2019 रोजी 
                              साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकून एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु covid-19 प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलीवंदन व रंगपंचमी हा सण साधेपणाने साजरे करावा. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करणे आवश्यक आहे. 
  • होळी सणा निमित्ताने खास करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते, परंतु या वर्षी पालखीला  घरोघरी न नेतो मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही. सोशल डिस्टंसिंग चे तंतोतंत पालन होईल याकडे लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी. 
  • होळी व धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत.
  • प्रस्तुत मार्गदर्शक सूचनांपेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनाने यापूर्वी लावले असतील तर ते लागू राहतील अथवा या परिपत्रका नंतर देखील स्थानिक प्रशासन निर्बंध लावू शकतील.
  • मात्र प्रस्तुत मार्गदर्शक सूचना यापेक्षा शिथिल करता येणार नाहीत.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून

Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group