Featured post

शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026

इमेज
शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026 📢 महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाने 02 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शाळांच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय विशेषतः Self-Financed Schools (स्वयंअर्थसहाय्ययत शाळा) साठी लागू आहे. :contentReference[oaicite:0]{index=0} 📚 शासन निर्णय का घेतला? अनेक शाळा “International”, “Global”, “World” असे शब्द वापरत होत्या पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती प्रत्यक्षात त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्हत्या शुल्क व गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होत होते 📌 नवीन नियम काय आहेत? नियम तपशील International / Global शब्द फक्त आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न शाळांनाच वापरता येतील CBSE / State Board शाळा या शब्दांचा वापर करता येणार नाही Convent शब्द फक्त ख्रिश्चन संस्थांनी चालवलेल्या शाळांसाठीच वापरता येईल Sainiki (सैनिकी) फक्त मान्यताप्राप्त सैनिक शाळांसाठी दिशाभूल करणारे श...

महाराष्ट्र अर्थसंकल्प ठळक वैशिष्ट्ये २१-२२ | Maharashtra Budget Highlights 21-22 | PRAKRUT INFO

माननीय उपमुख्यमंत्री वित्त श्री अजित पवार यांनी सोमवार दिनांक ८ मार्च २०१९ रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणातील  ठळक वैशिष्ट्ये
  •  आरोग्य संस्थांचे बांधकाम व संवर्धनासाठी ७५०० कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करण्यात येईल.
  •  महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती मध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या पाच वर्षात पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणार, त्यापैकी ८०० कोटी रुपये या वर्षी.
  •  कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात १५० रुग्णालयांमध्ये सुविधा
महाराष्ट्र अर्थसंकल्प ठळक वैशिष्ट्ये २१-२२ | Maharashtra Budget Highlights 21-22 | PRAKRUT INFO


  •  सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती व परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार
  •  ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा
  •  कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना
  •  प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे ५०० नवीन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार
  • राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या तीन वर्षात ६०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार
  • शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशीचा गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन कुक्कुट पालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टिंग करता अनुदान
  • नांदेड ते जालना २०० किलोमीटर लांबीचा द्रुतगती जोड महामार्गाचे नवीन काम हाती घेणार
  • पुणे शहराच्या बाहेरून चक्राकार मार्गाची रिंग रोड उभारणी १७० किलोमीटर लांबी
  • राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसेसचे सीएनजी व विद्युत् बसेसमध्ये रूपांतरण
  •  बस स्थानकांचे आधुनिकीकरण यासाठी १४०० कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित
  •  प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना, घरकुल योजनांसाठी ६ हजार ८२९ कोटी ५२ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येतील
  •  शासकीय व जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण अवस्थेतील इमारतींची पुनर्बांधणी व दुरुस्ती करण्याकरता तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा
  •  ग्रामपंचायतींमध्ये शिवराज्य सुंदर ग्राम अभियान राबविण्यात येणार उत्कृष्ट कार्य करणार्‍या ग्रामपंचायतींना पुरस्कार 
  • हिंदुहृद्य सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपये खर्चास मान्यता
  •  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचे उद्दिष्ट वाढून यावर्षी २५००० उद्योग घटकांना मदत करण्याचे उद्दिष्ट
  • एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत स्थानिक कारागीर, मजूर व कामगारांना कौशल्य वर्धनासाठी सहाय्य करून त्यांच्या उत्पादनांसाठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार
  •  नागपुर-मुंबई समृद्धी महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावर मेघा इलेक्ट्रिकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार
  • राजमाता जिजाऊ स्वामिनी योजनेअंतर्गत गृहखरेदी ची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत
  •  ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना 
  • शासनाकडून राज्य परिवहन महामंडळासाठी पर्यावरणपूरक १५०० सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करून देणार
  • मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी तेजस्विनी योजनेत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करून देणार 
  • पुण्यातील साखर संकुलात सुमारे ४० कोटी रुपये खर्चून साखर संग्रहालय उभारण्याचे प्रस्तावित 
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्वावर इ. सहावीपासून सीबीएससी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार 
  • दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल असे वेब अप्लिकेशन तयार करण्यात येणार
  • तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना सुरू करण्यात येणार 
  • स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला निधी देण्यासाठी साखर कारखान्यांकडून ऊस गाळपानुसार प्रतिटन १० रुपये आकारून तेवढाच निधी शासनाकडून देण्यात येणार
  • १०० शासकीय आदिवासी आश्रम शाळांचे मॉडेल निवासी शाळांमध्ये रूपांतरण करणार 
  • रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळ पाडा येथे पथदर्शी तत्त्वावर कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत स्थापन करणार

डाउनलोड महाराष्ट्र अर्थसंकल्प ठळक वैशिष्ट्ये १


डाउनलोड महाराष्ट्र अर्थसंकल्प ठळक वैशिष्ट्ये 



अर्थसंकल्पीय भाषण १



अर्थसंकल्पीय भाषण २






टिप्पण्या

Popular Posts

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर