प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना | pradhanmantri krushi sinchan yojana | PRAKRUT INFO

 योजनेचे नाव : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

योजनेची टाग लाईन : प्रती थेंब अधिक पिक

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश : 

शेती क्षेत्रात कमी पाण्यावर अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी देशभरात विविध प्रयोगानंतर सूक्ष्म सिंचनाद्वारे चांगले उत्पन मिळत असल्याचे लक्षात आले व पाण्याची बचत सुद्धा मोठ्या प्रमाणवर होते. देशभरात शेतीसाठी मोठ्या भूभागावर १२ महिने पानाची उपलब्धता उपलब्धता नसते. त्यामुळे कमी पाण्यावर अधिक उत्पन्न काढण्यासाठी सूक्ष्म सिंचन खूप म्हत्वाचे आहे.

मात्र हे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या खरेदी करणे शक्य नसल्यामुळे शासनाने यात मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्याचे ठरवले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे कमी पाण्यावर उत्पन्न वाढेल.

 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे लाभ :

  • ठिबक सिंचन व तुषार सिंचनसाठी
  • अल्पभूधारक शेतकरी - ५५ % अनुदान
  • ईतर शेतकरी - ४५ टक्के अनुदान

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी पात्रता :

  • शेतकऱ्याने १७-१८ च्या नंतर विशीष्ट सर्वे नंबर साठी ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याच सर्वे नंबर साठी पुढील ७ वर्षे परत लाभ घेता येणार नाही.
  • एका शेतकऱ्याला ५ हेक्टर पर्यंत सूक्ष्म सिंचनासाठी लाभ देण्यात येईल.
  • शेतकऱ्याकडे कायमची व पक्की पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
  • त्यासाठी कायमचे विद्यत जोडणी आवश्यक असून, वीज बिलाची ताजी प्रत सोबत जोडावी लागेल.
  • सूक्ष्म सिंचन प्रणाली शासन मान्यता प्राप्त कंपनीची असावी व ती त्यांच्या अधिकृत विक्रेत्या कडून खरेदी केलेली असावी.
  • शेतकऱ्याला खरेदीची पूर्व संमती मिळाल्यानंतर, ३० दिवसाच्या आत पुढील गोष्टी कराव्यात.
  • त्याने अधिकृत विक्रेता / वितरकाकडून सूक्ष्म सिंचन खरेदी करावे.
  • शेतात ते स्थापित करून सूक्ष्म सिंचन खरेदी केलेल्या पावत्या ऑनलाईन अपलोड कराव्यात. 


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. राष्ट्रीयकृत बँक खात्याची पासबुक झेरॉक्स
  3. ७/१२
  4. ८ अ
  5. कृषी वीज बिल
  6. शेतकऱ्याने केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत
  7. पूर्वसंमती पत्र
  8. बिलाची मूळ प्रत
  9. कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र
  10. GEO टागिंग फोटो
  11. शेतकऱ्याचे हमीपत्र
  12. शेतकरी एससी, एसटी जातीचा असेल तर त्यांच्यासाठी काही विशेष सवलती असल्यामुळे जातीचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज कसा करावा


    प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना | pradhanmantri krushi sinchan yojana | PRAKRUT INFO


    Thumbnail Ad 300*180

    Square ad 300*300

    💬 Join Free WhatsApp Group