शाळांमधील शुल्क नियमांबाबत सूचना पाठवणे प्रस्तावना :
खाजगी शाळांमधील शुल्काबाबत शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क (विनीयमन) अधिनियम 2011 तसेच सुधारित 2016 व 2018 तयार केलेले आहे. तथापि सदर अधिनियमांची नियमावली अंमलबजावणी करताना प्रशासकीय स्तरावर अडचणी येतात तसेच शाळेतील शुल्काबाबत पालकांच्या सातत्याने तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. त्याला अनुसरून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी दिनांक 5 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये एक समिती गठीत करण्यात आली आहे.शाळांमधील शुल्क नियमांबाबत सूचना पाठवणे समिती गठीत :
- इम्तियाझ काझी, ( सहसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई ) - समितीचे अध्यक्ष
- श्री दिनकर पाटील, ( संचालक, बालभारती ) - समितीचे सदस्य
- श्री गोपाल तुंगार, ( सहसचिव विधी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई ) - समिती सदस्य
- श्री वाघोले, ( सहसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई ) - समिती सदस्य
- श्री दिनकर टेमकर, ( संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय ) - समिती सदस्य
- श्री बी बी चव्हाण, ( शिक्षणाधिकारी माध्यमिक औरंगाबाद ) - समिती सदस्य
- श्री रजाक नाईकवाडे, ( शिक्षण उपनिरीक्षक मुंबई ) - समिती सदस्य
- श्री दयानंद कोकरे ( वरिष्ठ लेखापरीक्षक सोलापूर ) - समिती सदस्य
- श्रीधर शिंदे ( अधीक्षक शिक्षण आयुक्तालय पुणे ) - समिती सदस्य सचिव
शाळांमधील शुल्क नियमांबाबत समितीची कार्यकक्षा :
- महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियमामध्ये सुधारणा सुचविण्यात व नवीन अधिनियम प्रस्तावित करणे
- इतर राज्यातील फी बाबत अधिनियम व नियम यांचा अभ्यास करून राज्यासाठी सुसंगत धोरण सुचवणे
- पालकांच्या तक्रारींचे स्वरूप यांचा अभ्यास करणे व तक्रारींचे निराकरण करण्याची पद्धत सुचवणे
- त्यापूर्वी श्री विजय पळशीकर समितीने शासनास सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करून सुधारणा सुचवणे
- स्वयंअर्थसहाय्यित शाळा संबंधित नियम, कॅपिटेशन फी, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था इत्यादी न्यायालयीन निर्णय कायदे व नियम इत्यादींचा अभ्यास करून सूत्राचा ठरविण्यासाठी उपाययोजना सुचवणे
शाळांमधील शुल्क नियमांबाबत सूचना पाठवणे कालावधी :
तर मित्रांनो आज पासून महिन्याचा कालावधी म्हणजे 16 एप्रिल 21 पर्यंत आपण यासाठी सूचना पाठवू शकतो.
शाळांमधील शुल्क नियमांबाबत येथून सूचना पाठवा :
( शासनाचा सर्व्हे येथे इमबेल्ड केलेला आहे. )
समिती गठीत करणे परिपत्रक
डाऊनलोड महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम सुधारण्यासाठी समिती गठीत परिपत्रक
सूचना पाठवणे परिपत्रक
