वाहन मोडीत काढणे धोरण जाहीर | vahan modhit kadhane dhoran jahir | PRAKRUT INFO

श्री.नितीन गडकरी ( रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ) यांनी दि. १८ मार्च २०२१ रोजी लोकसभेत  वाहन स्क्रॅपिंग (वाहन मोडीत काढणे) धोरण जाहीर केले. जुनी झालेली वाहने चांगल्या स्थितीत असलेल्या वाहनांपेक्षा १० ते १२ पट जास्त वातावरण प्रदूषित करतात आणि ते रस्ता सुरक्षेसाठी धोकादायक सुद्धा असतात. चांगले वातावरण व वाहनचालक आणि पादचाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी नादुरुस्त आणि प्रदूषण करणारी वाहने काढून टाकण्याच्या दृष्टीने हे धोरण जाहीर केल्याचे श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले.

वाहन स्क्रॅपिंग (वाहन मोडीत काढणे) धोरणासाठी सूचना व मते मागवणे


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मंत्रालय  येत्या काही दिवसात या अधिसूचनेचा मसुदा प्रकाशित करेल, जो सगळ्यांची मते व सूचना जाणून घेण्यासाठी एक महिन्याच्या कालावधीकरिता सार्वजनिक केला जाईल.

वाहन स्क्रॅपिंग (वाहन मोडीत काढणे) धोरणात सुचविण्यात आलेले प्रस्ताव

  1.  १५ वर्षापुढील व्यावसायिक वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यास अपात्र ठरल्यास त्या वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव आहे.
  2. व्यावसायिक वाहनांसाठी १५ वर्षानंतर फिटनेस प्रमाणपत्र व फिटनेस चाचणीसाठी आगाऊ शुल्क लागू शकते.
  3. २० वर्षापुढील खासगी वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र मिळवण्यास अपात्र ठरल्यास त्या वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव आहे.
  4. खासगी वाहनांसाठी २० वर्षानंतर फिटनेस प्रमाणपत्र व फिटनेस चाचणीसाठी आगाऊ शुल्क लागू शकते.
  5. केंद्र शासन, राज्य शासन, महानगरपालिका, पंचायती, राज्य परिवहन उपकर्म, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि केंद्र व राज्य शासन यांच्या स्वायत्त संस्थांची सर्व  वाहने १५ वर्षानंतर मोडीत काढण्याचा प्रस्ताव आहे.
  6. सादर योजनेंतर्गत जुन्या वाहनांच्या मालकांना अयोग्य वाहने मोडीत काढण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. वाहन मालकांना प्रमाणपत्र सुद्धा दिले जाईल.
त्याचबरोबर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा  केंद्र (आरव्हीएसएफ) उघडण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी सहभागास प्रोस्ताहित करेल.

वाहन मोडीत काढणे धोरण जाहीर | vahan modhit kadhane dhoran jahir | PRAKRUT INFO


Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group