वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक 2021 दि. १६ मार्च २०२१ रोजी राज्यसभेने या विधेयकाला मान्यता दिली. तसेच दि. १७ मार्च २०२० रोजी हे विधेयक लोकसभेत संमत झाले होते.
वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक 2021 ठळक वैशिष्ठे
- गर्भपाताची मुदत मर्यादा २० आठवड्यावरून २४ आठवडे करण्यात आली आहे. ( या मध्ये अल्पवयीन, दिव्यांग, पिडीत, बलात्कार यासारख्या महिलांचा समावेश असेल. )
- २० आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी एका डॉक्टरचा सल्ला तर २०-२४ आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी दोन डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक असेल.
- वैद्यकीय मंडळाद्वारे सिद्ध झालेल्या गर्भ विकृतींच्या बाबत गर्भपाताची कमाल मर्यादा लागू होत नाही.
- गर्भपात करणाऱ्या महिलांची कोणतीही माहिती, कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्ती व्यक्तीशिवाय कुणालाही दिली जात नाही.
- गर्भनिरोधक अपयशाचे कारण महिला व जोडीदारापर्यंत वाढविण्यात आले.
वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक 2021 हे विधेयक कायदेशीर गर्भपात सेवांचा विस्तार तसेच मानवी आणि सामाजिक आधारावर आणण्यात आले आहे.
कठोर अटी व सेवा आणि सुरक्षित गर्भपात कुठल्याही गुणवत्तेशी तडजोड न करता विशिष्ठ परिस्थितीत गर्भपाताची कमाल मर्यादा वाढवून, गर्भपात सेवेतील सर्वसमावेशक प्रवेश मजबूत करण्याच्या उद्देशाने गर्भपात कायदा १९७१ मध्ये काही कलमांतर्गत काही कलमे समाविष्ट करणाचा समावेश आहे.
महिलांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयांचा अनेक महिलांना फायदा होईल. या विधेयकातील सुधारणांमुळे महिलांना सुरक्षित गर्भपात सेवेची महत्त्वाकांक्षा व प्रवेश वाढेल आणि ज्या महिलांना गर्भपात सेवेची आवश्यकता असेल त्यांना सन्मान, स्वायत्तता, गोपनीयता आणि न्याय मिळेल.
