30 एप्रिल पर्यंतचे कोरोना निर्बंध | 30 April Corona Nirbandh | PRAKRUT INFO
- श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी
- सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहणार
- गर्दीचे ठिकाण बंद
- खाजगी कार्यालयांना घरूनच काम बंधनकारक
- केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू
- दिवसा जमाबंदी तर रात्री संचारबंदी
- मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांनाही घेतले विश्वासात
- आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्री ते सोमवार सकाळी असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडॉऊन
शेतीविषयक कामे सुरू शेती
शेती विषयक कामे, अन्नधान्य व शेतीमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरूच राहणार आहे.
दिवसा जमाबंदी तर रात्री संचार बंदी
राज्यामध्ये 144 कलम लागू केले जाणार आहे सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात येतील.
आवश्यक सेवेतील दुकाने सुरु
किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारचे दुकाने, बाजारपेठात 30 एप्रिल पर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण करावे व ग्राहकांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही ते पाहावे.
सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू
सार्वजनिक व खाजगी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे. रिक्षांमध्ये चालक व ०२ प्रवासी टॅक्सीमध्ये चालका शिवाय निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० % प्रवासी प्रवास करु शकतील.
सार्वजनिक व खासगी बसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. प्रवाशांनी मास्क घातलेला असावा. त्याचबरोबर आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. बस चालक व वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे व कोरोना निगेटिव प्रमाणपत्र सोबत बाळगावे. शासकीय कार्यालय 50% उपस्थित
मनोरंजन बंद
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, व्हिडिओ पार्लर, सभाग्रह, वॉटर पार्क, पूर्णपणे बंद राहतील.
प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद
सर्व धर्मियांचे प्रार्थना स्थळे बाहेरून येणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी बंद राहतील. मात्र त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी यांना दैनंदिन पूजा आरती करता येईल.
उपाहार गृह व बार पूर्णतः बंद
खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा सुरु
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांनी सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.
ई-कॉमर्स सेवा सुरू
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरू
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल.
शाळा महाविद्यालय बंद
मात्र दहावी व बारावी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस सुद्धा बंद राहतील.
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू
उद्योग उत्पादन क्षेत्र सुरूच राहणार आहे. मात्र या ठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत. याची काळजी सर्वांनी घ्यावी. आजारी कामगाराला काढता येणार नाही. बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर कामगारांना राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोरोना झाल्यास त्यांना या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे व रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल व कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करावयाचे आहे.
सोसायटी मिनि कन्टोमेन्ट झोन
पाच पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत असतील तर त्या सोसायटीला मिनी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येईल. तसा फलक सुद्धा सोसायटी मध्ये लावल्या जाईल व बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश बंद असेल

टिप्पण्या