मोफत शिवभोजन थाळी जीआर | GR Mofat Shivbhojan Thali | PRAKRUT INFO

ब्रेक बेचैन ची प्रक्रिया राज्यभर सुरू झालेली असताना या कालावधीमध्ये गरीब व गरजू लोकांना जेवणा अभावी हाल-अपेष्टा सहन कराव्या लागू नये यासाठी शिव भोजन थाळी लाभार्थ्यांना निशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
             दिनांक 15 एप्रिल 2021 पासून पुढील एक महिन्याचा कालावधी मध्ये मोफत शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यात शिव भोजन थाळी दोन लक्ष प्रतिदिनी वाटपाचे उद्दिष्ट राहील. 



मोफत शिवभोजन थाळी  मार्गदर्शक सूचना

  1. शिवभोजन थाळी दुपारी ११ ते ४ या वेळेत उपलब्ध असेल.
  2. शिवभोजन थाळी फक्त पार्सल मध्येच मिळेल.
  3. कोणताही लाभार्थी परत जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार.
  4. सबब कारणाशिवाय कुठलेही शिवभोजन थाळी केंद्र बंद राहणार नाही.
  5. लाभार्थी व कर्मचारी यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल.
  6. सामाजिक अंतर राखले जाईल याची सुध्दा खबरदारी सर्वांनी घ्यावयाची आहे.
  7. सर्व कर्मचार्यांनी ठराविक वेळेनंतर साबणाने हात धुवावे.
  8. सर्व शिव भोजन केंद्राची पुरवठा यंत्रणेद्वारे सखोल तपासणी होणार.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group