Featured post

शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026

इमेज
शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026 📢 महत्वाची बातमी महाराष्ट्र शासनाने 02 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, शाळांच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय विशेषतः Self-Financed Schools (स्वयंअर्थसहाय्ययत शाळा) साठी लागू आहे. :contentReference[oaicite:0]{index=0} 📚 शासन निर्णय का घेतला? अनेक शाळा “International”, “Global”, “World” असे शब्द वापरत होत्या पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत होती प्रत्यक्षात त्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नव्हत्या शुल्क व गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होत होते 📌 नवीन नियम काय आहेत? नियम तपशील International / Global शब्द फक्त आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न शाळांनाच वापरता येतील CBSE / State Board शाळा या शब्दांचा वापर करता येणार नाही Convent शब्द फक्त ख्रिश्चन संस्थांनी चालवलेल्या शाळांसाठीच वापरता येईल Sainiki (सैनिकी) फक्त मान्यताप्राप्त सैनिक शाळांसाठी दिशाभूल करणारे श...

महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉनचे आयोजन | Maharashtra Health hackthon | PRAKRUT INFO

शासनाच्या आरोग्य विभागात येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन या नावाने एक उपक्रम राबविण्यात येत आहे. हा एक महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. 
महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉनचे आयोजन | Maharashtra Health hackthon | PRAKRUT INFO


                                                 महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन हा एक असा उपक्रम आहे की ज्यात आरोग्य विषयातील विशिष्ट समस्यांवर विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा एक संघ बनवून मर्यादित कालावधीत नाविन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना यावर उपाय शोधण्यात येणार आहेत. आरोग्य विभागातील वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उपाययोजना शोधण्यासाठी महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन या व्यासपीठाचा उपयोग केला जाणार आहे

महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन पात्रता : 

  • महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक यात सहभागी होऊ शकतात.
  • विविध क्षेत्रातील अनुभवी व्यवसायिक शिक्षण तज्ञ आणि कौशल्य प्रदान असलेले सर्व व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात.
  • वैद्यकीय क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक नाही.
  • या उपक्रमात सहभागासाठी प्रभावशाली उपाययोजना करताना अर्जदारांची वचनबद्धता आणि सहयोग करण्याची तयारी सर्वात महत्वाचे आहे.

महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  दिनांक 07 एप्रिल 2021

प्रत्येक ट्रॅकमधील सर्वोत्कृष्ट कल्पनांना पुरावा संकल्पना विकसित करण्यासाठी मार्गदर्शन, प्री-इनक्युबेशन ऑफर, गुंतवणूकदारांपुढे सादरीकरणाची संधी मिळणार नाही, ५ हजार डॉलरपर्यंत क्लाऊड क्रेडिट असे विविध फायदे मिळणार आहेत.

महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन ट्रॅक 

ट्रॅक अ : लसीकरण
ट्रॅक ब  : परवडणाऱ्या दरात रोगनिदानाची उपकरणे
ट्रॅक क : प्रतिसादात्मक अत्यावश्यक सेवा
ट्रॅक ड  : नवजात बालकांची काळजी सुधारण्यासाठी वैद्यकीय उपकरणे

महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन वेळापत्रक

 दिनांक 23 एप्रिल 2021 शुक्रवार
06.30 PM -  महाराष्ट्र हेल्थ हॅकॅथॉन प्रस्तावना 
 08.00 PM - समस्या सादरीकरण
 दिनांक 24 एप्रिल 2021 शनिवार 
09.00 AM - मार्गदर्शक उपलब्ध 
10.00 AM - कार्यसंघ नोंदणीची अंतिम मुदत
07.00 PM -  सराव पिच
दिनांक 25 एप्रिल 2021 रविवार 
10.00 AM - अंतिम सादरीकरण
10.00 AM - अंतिम सादरीकरणाचा परीक्षकांद्वारे आढावा
02.00 PM - पुरस्कार आणि बक्षीस वितरण

अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यासाठी नोंदणी करू शकता.

टिप्पण्या

Popular Posts

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026: अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया

लोकशाहीर वामनदादा कर्डक पुरस्कार 2026: ₹51,000 रोख पारितोषिक, पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती

एफपीओंसाठी दिलासा: वार्षिक विवरणपत्र न सादर करणाऱ्यांसाठी दंड सवलत योजना जाहीर