डाउनलोड शक्ती फौजदारी कायदा विधेयक , २०२० | Download Shakti Criminal Law Bill, 2020 | PRAKRUT INFO

शक्ती फौजदारी कायदा विधेयक , २०२०

सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. ५१

शक्ती कायदाचा उद्देश

राज्यामध्ये महिला व बालकांच्याअपराधामध्ये विशेषतः लैंगिक अपराधांमध्ये अनेक पटींनी वाढ झालेले दिसत आहे. पूर्वीच्या अनेक अधिनियमामध्ये दंडात्मक तरतुदी केलेल्या असून देखील महिलांवर व बालकांवर  सतत दुष्कृत्य अमानवी कृत्ये करीत आहेत. अलीकडेच राज्यामध्ये अनेक अमानवीय कृत्य घडून आलेली असून, अशा घटनांमुळे समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला धक्का बसत आहे त्यामुळे हा कायदा करण्यात येत आहे.

डाउनलोड शक्ती फौजदारी कायदा विधेयक , २०२० | Download Shakti Criminal Law Bill, 2020 | PRAKRUT INFO



शक्ती कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी

- शक्ती कायद्यांतर्गत २१ दिवसाच्या आत खटल्याचा निकाल लागणार

- बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार
- अतिशय दुर्मीळ प्रकरणात फाशीच्या शिक्षा, जन्मठेप व दंड
- ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप व दंडाची तरतूद
- महिलांवरील क्रूर अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये मृत्युदंड
- १६ वर्षांपेक्षा लहान मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप
- सामूहिक बलात्कार प्रकरणी - २० वर्ष कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप व १० लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड
- १६ वर्षांपेक्षा लहान मुलींवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप व दहा लाख रुपये दंड
- १२ वर्षांपेक्षा लहान मुलींवर अत्याचार झाल्यास कठोर जन्मठेप व दहा लाख रुपये दंड
- दुबार अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप
- सर्व गुन्हे अजामीनपात्र
- बलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास व दंड
- एसिड हल्ला प्रकरणात १० वर्षे किंवा मरे पर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि पिडीतेला दंड रक्कम द्यावी लागणार
- एसिड फेकणे प्रकरणात १० ते १४ वर्षापर्यंत तुरुंगवास
- महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड
- कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी सुद्धा विविध शिक्षेच्या तुरतुदी

डाउनलोड शक्ती फौजदारी कायदा विधेयक , २०२० | Download Shakti Criminal Law Bill, 2020


Thumbnail Ad 300*180

Square ad 300*300

💬 Join Free WhatsApp Group