शाळांच्या नावात “International”, “Global” शब्द वापरण्यावर निर्बंध | शासन निर्णय 2026
शेतमालाच्या उत्पादकाला व ग्राहकाला काय हवे आहे याचा शोध घेऊन त्यानुसार पीक पद्धती, कृषी प्रक्रिया, पुरवठा साखळी व विक्री व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना विकेल ते पिकेल हे अभियान मदत करेल. उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्री साखळ्या आणि कृषी आधारित उद्योजकांच्या माध्यमातून नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा आणि जोखीम निवारा क्षमता विकसित करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या संबंधित योजनाद्वारे गुंतवणूक केली जाईल. त्यासाठी पीकनिहाय विविध मूल्य साखळी प्रकल्प उभे करण्याला कृषी विभाग मदत करेल. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संघ/संस्थांच्या माध्यमातून काढणीपश्चात हाताळणी, मूल्यवर्धित आणि प्राथमिक प्रक्रिया केलेला माल संघटित खरेदीदार, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांना पुरवठा करण्याची व्यवस्था उभी करण्यावर भर देण्यात येईल.
विकेल ते पिके अभियान उद्दिष्टे
विकेल ते पिकेल या अभियानावर काम करत असताना सर्व ठिकाणी लगेच मोठमोठे प्रकल्प उभारणे अथवा प्रक्रिया करणे शक्य होणार नाही. तथापी शेतकरी सध्या घेत असलेल्या पिकांची/शेतमालाची प्रचलित विपणन व्यवस्थेतशिवाय ग्राहकांची जोडणी करणे काही प्रमाणात सहज शक्य आहे. त्याशिवाय ग्राहकांच्या मागणीप्रमाणे काही पिकांची जाणीवपूर्वक लागवड वाढविणे, भौगोलिक मानांकन प्राप्त पिकांचे ब्रँडिंग करणे व त्या पिकांना वाजवी दर मिळवून देणे यासाठी प्रयत्न करता येतील. यामध्ये सध्या शेतकरी येत असलेले आणि प्रक्रियेविना थेट ग्राहकोपयोगी असलेली पिके व प्रक्रियेविना वापर न होणारी पिके यांचा समावेश होतो.
शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहकांपर्यंत पोहोचविणे अस्तित्वात असलेल्या साखळीतील टप्पे कमी करणे, विक्री तंत्रासाठी आवश्यक किमान दर्जा, प्रतवारी, स्वच्छता व सुकविणे यासारख्या कमी खर्चाच्या परंतु खूप फरक करणाऱ्या घटकांसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
कार्यवाहीचे स्वरूप
हे शासन परिपत्रक कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभाग यांच्या वतीने दि. २७-१०-२०२० रोजी प्रसिद्ध केले असून त्याचा संकेताक २०२०१०२७१६५१२८४३०१ असा आहे.
https://drive.google.com/file/d/1GofRRRWS-xoC9grgp5ArXmAE5JUN6_KB/view?usp=sharing
टीम – प्राकृत फूड्स
०७५०४८३२०२०
महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.
https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1
धन्यवाद.....
टिप्पण्या
धनयवाद..........