पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठीत टिपण्णी : मन की बात 28 फेब्रुवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी | Mann Ki Baat Prime Minister Narendra Modi's remarks in Marathi on 28 February 2021 | PRAKRUT INFO

इमेज
  आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणे. आपल्या देशातल्या लोकांनी बनविलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं आत्मनिर्भरतेची पहिली अट असते. ज्यावेळी प्रत्येक देशवासीयाला असा अभिमान वाटेल आणि तो त्या वस्तूशी जोडला जाईल तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल. तेव्हा हे एक आर्थिक अभियान राहणार नाही तर ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज आकाशवाणीवरून ‘मन  की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते.  संरक्षण साहित्य, मेट्रो कोच आदीची भारतात निर्मिती अशा मोठ-मोठ्या गोष्टींमुळेच भारताला आत्मनिर्भरता येईल असे नाही तर  भारतामध्ये बनणारे कापड, भारतातल्या प्रतिभावंत कारागिरांनी बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, भारतात बनणारे मोबाइल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपल्याला गौरव वाढवायचा आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.  ज्यावेळी आपण असा विचार करून पुढची वाटचाल करणार आहोत, त्याचवेळी ख-या अर्थाने देश आत्मनिर्भर बनणार आहे. आणि आत्मनिर्भर भारताचा हा  मंत्र, देशातल्या गावां-गावांमध्ये पोहोच...

मराठीत भाषण: मन की बात 28 फेब्रुवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी | Mann Ki Baat Prime Minister Narendra Modi's speech in Marathi on 28 February 2021 | PRAKRUT INFO

इमेज
  माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!  माघ या महिन्याचा संबंध विशेषत्वानं नद्या, सरोवर आणि जलस्त्रोतांबरोबर : काल माघ पौर्णिमेचा दिवस होता. माघ या महिन्याचा संबंध विशेषत्वानं नद्या, सरोवर आणि जलस्त्रोतांबरोबर असतो, असं मानलं जातं. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की - ‘‘माघे निमग्नाः सलिले सुशीते, विमुक्तपापाः त्रिदिवम् प्रयान्ति।।’’ याचा अर्थ असा आहे की, माघ महिन्यामध्ये कोणत्याही पवित्र जलाशयामध्ये स्नान करणं, पवित्र मानलं जातं. दुनियेतल्या प्रत्येक समाजामध्ये नदीशी संबंधित काही ना काहीतरी परंपरा असतातच. नदीकाठच्या भागांमध्येच अनेक संस्कृती, वसाहती विकसित झाल्या आहेत. आपली संस्कृती हजारो वर्षांची आहे, त्यामुळे तिचा विस्तार आपल्या इथं खूप जास्त झाला आहे.देशाच्या कोणत्या ना कोणत्या कानाकोप-यामध्ये पाण्याशी संबंधित एखादा उत्सव, सण नाही,  असा भारतामध्ये  एकही  दिवस जाणार नाही. माघातल्या दिवसांमध्ये तर लोक आपलं घर, परिवार, घरातल्या सुख-सुविधा सोडून संपूर्ण महिनाभर नदीकिनारी ‘कल्पवास’  करण्यासाठी जाणारी अनेक मंडळी आहेत. यंदा हरिव्दारमध्ये कुंभही होत आहे. ...

केंद्रीय टीईटी 2021 चा निकाल जाहीर | Results of Central TET 2021 | PRAKRUT INFO

इमेज
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) २०२१ चा निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या  केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल सीबीएसई वेबसाइटवर CTET ONLINE RESULT http://cbseresults.nic.in/ctetJan21/ctetJan21.htm/   वर जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी एकूण ६५४२९९ उमेदवारांनी सीटीईटी २०२१ परीक्षा दिली आहे. त्यापैकी  ४१४७९८  उमेदवारांनी पेपर-१  पात्र केला आहे आणि   २२९५०१ उमेदवारांनी पेपर -२ पात्र केला आहे. जानेवारी २०२१ मध्ये सीटीईटी परीक्षेस बसलेल्या उमेदवारांची मार्कशीट व पात्रता प्रमाणपत्र डिजी लॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे .  पात्र उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर लॉगिन तपशील प्रदान केला जाईल. सीटीईटी २०२१ चे निकाल खालील वेबसाईट वर ऑनलाइन बघा http://cbseresults.nic.in/ctetJan21/ctetJan21.htm/  

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च | Maharashtra Budget Convention March 1 to 10 | PRAKRUT INFO

इमेज
२०२१ अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी :   सोमवार दि. ०१ - १० मार्च २०२१ २०२१ अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थळ  :   विधान भवन, मुंबई  २०२१ अर्थसंकल्प सादर करण्याचा दिनांक :  सोमवार दि. ८ मार्च २०२१ अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज २०२१ पुढीलप्रमाणे : १ मार्च - राज्यपालांच्या दोन्ही सभागृहात दिलेल्या भाषणानंतर अधिवेशनाला  सुरुवात १ मार्च  -  सरकार पुरवणी मागणी मांडेल २ मार्च - राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल ३ - ४ मार्च - पुरवणी मागण्यांवरील चर्चेसाठी राखीव ठेवण्यात येईल ५ मार्च - विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल आणि काही बिलेही सादर केली जातील. ६ - ७ मार्च - शनिवार व रविवार मुळे कामकाज बंद राहील ८ मार्च - अर्थसंकल्प सादर केला जाईल ९ - १० मार्च - अर्थसंकल्पावर चर्चा होईल आणि विनियोग विधेयक मंजूर होईल   विधान भवनात  कोविड-१९ (कोरोना) विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता : विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता R...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नियमावली - २०२१ | Social Media Platform Rules - 2021| PRAKRUT INFO

इमेज
  डिजिटल मिडिया वापरकर्त्यांचे हक्क, उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेचा अभाव  यासंदर्भातल्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर  आणि सार्वजनिक आणि संबंधितांशी विस्तृत चर्चेनंतर माहिती तंत्रज्ञान ( प्लॅटफॉर्म मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मिडिया आचारसंहिता) नियमावली 2021 आखण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 87 (2) अंतर्गत मिळालेल्या अधिकारा अंतर्गत  आणि आधीचे माहिती तंत्रज्ञान (मध्यावधी मार्गदर्शक तत्वे) नियम 2011 रद्द ठरवत  नवी नियमावली आखण्यात आली आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, डिजिटल मिडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्म संबंधी सुसंवादी आणि मृदू यंत्रणेच्या दृष्टीने, हे नियम निश्चित करताना  इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयांनी आपसात विस्तृत चर्चा केली. या नियमांचा भाग II इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आणि डिजिटल मिडियाशी संबंधित आचारसंहिता आणि प्रक्रिया याच्याशी संबंधित भाग III  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली राहील. पूर्वपीठीका : डिजिटल इंडिया कार्यक्रम आता...