पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरकारचा खत अनुदान वाढीचा ऐतिहासिक शेतकरी हिताचा निर्णय | Khat Bhav Vadh Honar Nahi | PRAKRUT INFO

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली खत दराच्या प्रश्नावर   उच्चस्तरीय बैठक झाली. खतांच्या दराच्या मु द्या वर सविस्तर सादरीकरण करून त्यांना माहिती देण्यात आली. सरकारचा खत अनुदान वाढीचा ऐतिहासिक शेतकरी हिताचा निर्णय डीएपी म्हणजेच डाय-अमोनियम फॉस्फेट खतांवरील अनुदानात 140% वाढ शेतकऱ्यांना डीएपीच्या प्रत्येक पिशवीसाठी 500 रुपयांऐवजी 1200 रुपये अनुदान मिळणार शेतकऱ्यांना डीएपीची पिशवी 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार या अनुदानापोटी सरकार 14,775 कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार आंतरराष्ट्रीय किंमतीत वाढ असली तरी शेतकऱ्यांना जुन्या दरानेच खते मिळायला हवीत: पंतप्रधान शेतकऱ्यांचे कल्याण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य - पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक ऍसिड  , अमोनिया इत्यादींच्या वाढत्या किंमतींमुळे खतांच्या किंमतीत वाढ होत असल्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीत वाढ असली तरी  शेतकऱ्यांना  जुन्या दरानेच खते मिळाली पाहिजेत  , यावर पंतप्रधानांनी भर दिला. डीएपी खतासाठीचे अनुदान 500 रुपये प्रति पिशवी वरून 140%  वाढवू...

मंत्रिमंडळ निर्णय दि. १९ मे २०२१ | Mantri Mandal Nirnay 19 May 21 | PRAKRUT INFO

इमेज
  जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्त्वाची भूमिका ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात, विभागीय आयुक्त कार्यालयात ग्राम सेवक /ग्राम विकास अधिकारी यांना बैठकांना हजर रहावे लागते. तसेच, ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती, पाणीपुरवठा साहित्य, आरोग्य संबंधित साहित्य, वेगवेगळ्या योजनांची बांधकाम साहित्य तसेच कर वसूली भरण्याकरीता तालुका स्तरावर जावे लागते. बचतगटांच्या कर्जमंजूरीसाठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना घर बांधणीचे सामान उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते. ग्राम पंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती ...

परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत | Peksha Chalkana Milnar Aarthik Madat

इमेज
  परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य म्हणून रु.१५००/- एवढे अर्थ सहाय्य देण्याबाबत दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी उपमुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रिक्षा चालकांना कोणतेही कागदपत्र सादर न करता केवळ ऑनलाईन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. सदर माहिती संगणक प्रणालीवर प्रमाणित करण्यात येईल. याबाबत कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित करण्यात आली असून, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्यात आहे. दि. २२ मे २०२१ पासून रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण दि. २१ मे २०२१ रोजी करण्यात येणार आहे. या प्रयोजनार्थ शासनाकडून संपूर्ण निधी उपलब्ध झाला असल्याने, ज्या रिक्षा चालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्वरित जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

कोविड --19 मुळे प्रभावित मुलांना संवेदना मार्फत दूरध्वनीवरून समुपदेशन | Telephone counseling to children affected by Covid-19

कोविड-19 मुळे प्रभावित  मुलांना मानसिक प्रथमोपचार आणि भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) संवेदना  (भावनिक विकासाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत  संवेदनशील कृती) मुलांना दूरध्वनीद्वारे समुपदेशन पुरवत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात  पीडित मुलांसाठी मनोवैज्ञानिक -सामाजिक मानसिक आधार देण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन सुरू केली. कोविड - 19 संदर्भात विविध मनोविकार विषयक मुद्द्यांना बालक आणि किशोरवयीन मानसोपचार विभागाचे प्रा  डॉ. शेखर शेषाद्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित पात्र तज्ञ/समुपदेशक/मानसशास्त्रज्ञांच्या नेटवर्कद्वारे दूरध्वनीवरून समुपदेशन प्रदान केले जात आहे. महामारी दरम्यान तणाव, चिंता, भीती आणि इतर समस्या सोडवण्यासाठी मुलांना मानसिक आधार देणारी संवेदना ही समुपदेशन सेवा  आहे. ही सेवा टोल-फ्री क्रमांक: 1800-121-2830 वर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 3  ते  संध्याकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.  ही सेवा केवळ अशा मुलांसाठी आहे जे बोलण्यास इच्छुक आहेत आणि ज्यांना समु...

‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश | Inclusion of Mucormycosis in Mahatma Jotirao Phule Jan Arogya Yojana

इमेज
‘म्युकरमायकोसीस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश; औषधोपचारासाठी ३० कोटींचा निधी उपलब्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा   by   Team DGIPR     मे 17, 2021   1 min read लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश मुंबई, दि. १७ :-  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसिवीरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित  उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. ‘म्युकरमायकोसीस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक 30 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपम...

तोक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

इमेज
तोक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे. यासाठी सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागाने जाहीर केले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- मुंबई शहर वरळी / ससून गोदी : कु. पाटील (७९७२२६३९४७) नवीन भाऊचा धक्का: श्री. बादावार (९४२२८७२८५६) ठाणे / पालघर ठाणे : श्री. पाटील (९९२३०५०९८३) डहाणू : कु. भोय (८६००६२७९०८) सातपाटी : श्री. बाविस्कर (८४४६३२५०४०) वसई : श्री. कोरे (९८२३०४११८९) एडवण : श्री. अलगिरी (९८२३२१२७२२) रत्नागिरी जयगड : सौ.कांबळे (८३६९०८५०४९) मिरकरवाडा : श्री. पाथरे (९५९४७४८७३८) साखारीनाटे : श्री. महाडवाला (९४०५९१०५०३) गुहाघर : श्री. देसाई (९४०५०८५६१५) दाभोळ : सौ.साळवी (८२७५४३५७०३) मुंबई उपनगर माहुल तुर्भे : श्री. साबळे (८२०८९०६९०२) वर्सोवा : श्री. बुंदेले (९८३३९११९०५) मढ गोराई...

राशन दुकाने महिन्यातील सर्व दिवस सुरु | Ration dukane Mahinyatil Sarv Divas Suru | PRAKRUT INFO

इमेज
काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविडमुळे लागू असणाऱ्या टाळेबंदीचा परिणाम स्वस्त धान्य दुकानांच्या वेळेवरही होऊ शकतो ,  हे लक्षात घेऊन केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ही दुकाने महिन्यातील सर्व दिवशी सुरु ठेवावीत असे निर्देश दिले आहेत. तसेच ,  कोविड नियमावलीचे पालन करत या दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना/प्रधानमंत्री-गरीब कल्याण अन्न योजना  III  या योजनांतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याचे वितरण लाभार्थ्यांना संपूर्ण दिवसभर व्हावे म्हणून वेळेच्या पालनात सूट देणारी नियमावली आज जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना  III  आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना या योजनांतर्गत मिळणारे धान्य या योजनांच्या लाभार्थ्यांना  योग्य आणि वेळेत वितरीत होऊ शकेल. स्वस्त धान्य दुकानांमधून गरजूंपर्यंत वेळेवर धान्य पोचण्यात  कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. या योजनेची आणि उपाययोजनांची माहिती अधिकाधिक लोकांप...

‘ब्रेक दि चेन’ आदेशामध्ये परराज्यातून होणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने सुधारणा

राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. १२ मे, २०२१ रोजी लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’ आदेशातील परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या मालवाहतुकीच्या अनुषंगाने मुद्दा क्र. ३ मध्ये सुधारणेबाबतचे आदेश राज्य शासनाने आज निर्गमित केले आहेत. हे आदेश दि. १२ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील. दि. १२ मे रोजीच्या आदेशातील मुद्दा क्र. 3 आता पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा. ‘मालवाहतूक करणाऱ्यांसाठी साधारणत: दोन पेक्षा जास्त लोक (एक चालक+ क्लीनर किंवा मदतनीस) किंवा विशेष स्थितीत, लांब पल्ल्याच्या प्रवास किंवा आपत्कालीन स्थितीत मालवाहतूक करणाऱ्यांसाठी तीन व्यक्ती (दोन चालक+ क्लीनर/ मदतनीस) यांना प्रवास करण्याची परवानगी असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्र राज्याबाहेरुन प्रवास करुन राज्यात येत असतील तर त्यांच्या शरीराचे तापमान व इतर लक्षणे तसेच ‘आरोग्य सेतू’ मध्ये त्यांच्या स्थितीची शहानिशा केल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश मिळेल. जर यापैकी एकाही व्यक्तिला लक्षणे असतील किंवा ताप असेल किंवा ‘आरोग्य सेतू’ मधील त्यांची स्थिती ‘सुरक्षित नाही (नॉट सेफ)’ अशी असेल तर ...

गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन

इमेज
  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उत्कृष्ठता  केंद्राकडून (सेंटर ऑफ एक्सलन्स) कोविड पॉझिटीव्ह रुग्णांसाठी “ गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी ”   या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. एम्स दिल्ली येथील डॉ मनीष, डॉ नीरज निश्चल यांनी या वेबिनारमध्ये तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. डॉ. मनीष यांनी  'सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपचारासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना'  तर  'गृह विलगिकरणातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी औषधांचे व्यवस्थापन'  यासंदर्भात डॉ. नीरज यांनी मार्गदर्शन केले. ताप, खोकला, थकवा, वास किंवा चव जाणे ही कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची सर्वसामान्य लक्षणे आहेत. तर, घसा खवखवणे (दुखणे), डोकेदुखी, अंगदुखी, अतिसार (जुलाब), त्वचेवर पुरळ येणे, डोळे लाल होणे ही साधारणतः रुग्णांमध्ये कमी प्रमाणात  दिसून येणारी लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसून येताच रुग्णांनी तातडीने अलगीकरण करुन घ्यावे, असे डॉ नीरज निश्चल यांनी सांगितले. कोविड रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण अति सौम्य लक्षणं असलेली अ...