शाळा व वसतिगृहे (आदिवासी विभागाअंतर्गातील ) सुरु करणे बाबत...

                                    राज्यातील आदिवासी विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील विद्यार्थांचे प्रत्यक्ष प्रथम: ई. ९ वी ते १२ वी चे             वर्ग ०१ डिसेंबर, २०२० पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच   ई. ९ वी ते १२ वीच्या या विभागांतर्गत असलेले शासकीय वसतिगृहे  सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

  शाळा व वसतिगृहे सुरु करण्यापूर्वी 


आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या बाबत मार्गदर्शक सूचना :

 • हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
 • थर्मोमिटर, थर्मल स्कॅनर, प्लस ऑक्सिमीटर, जंतुनाशक साबण, पाणी ई. उपलब्ध करावे.
 • शाळा / वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.
 • शाळा व वसतिगृहातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची दि. २३ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान कोविड १९ साठीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल.
 • वर्गखोली तसेच स्टाफ रूम / वसतिगृहातील खोल्मयांधील बैठक व्यवस्था शारिरीक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी.
 • वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.
 • वसतिगृहात एका खोलीत कमाल दोन विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था करावी.
 • थुंकण्याचावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
 • शारिरीक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात.
 • परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व ई. तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल.
 • शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात.
 • विद्यार्थ्यांना शाळेत/वसतिगृहात उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.
 • विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल.
 • विद्यार्थांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
 • शाळेत/वसतिगृहात दर्शनी भागावर Physical Distancing, मास्कचावापर ई. संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर्स / स्टिकर प्रदर्शित करावे.
 • शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट शारिरीक अंतर राखले जाईल या करिता विशिष्ठ चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ ई. वापर गर्दी होण्याऱ्या ठिकाणी जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे ई. ठिकाणी करण्यात याव्यात.

 शाळा व वसतिगृहे सुरु झाल्यानंतर


आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या बाबत मार्गदर्शक सूचना :

 • शाळेचा/वसतिगृहाचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा.
 • शाळा/वसतिगृहातील खोल्या व वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठ भाग जसे लचेस, अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टेबल, खुर्च्या ई. वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
 • शाळा/वसतिगृह व परिसरातील कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावावी.
 • हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हान्डवाश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी.
 • स्वच्तागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
 • वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेवू नये.
 • विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची दररोज साधी आरोग्य चाचणी जसे Tharmal Screening घेण्यात यावी.
 • विविध इयत्तांचे वर्ग सुरु व संपण्याच्या वेळामध्ये १० मि. अंतर असावे.
 • ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी.
 • शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे.  ( ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व ५० टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी  ) अशाप्रकारे एकाच दिवशी ५०टक्के विद्यार्थी अनलॉक वर्गात व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील.
 • प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये.
उपरोक्त सूचना व्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात.

सदर शासन परिपत्रक ( आदिवासी विकास विभाग ) महाराष्ट्र शासनाने दि. २० नोव्हेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२०११२०११३५२१०३२४ असा आहे.

अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1Rtl58lZPcnM7nt_VSPHRhfH-5182TS4x/view?usp=sharing

                                         टीम - प्राकृत फूड्स 
==============================================================

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.
 धन्यवाद.....