शेतकऱ्यांच्या बांधावर व शेत जमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत...

शेतकऱ्यांच्या बांधावर व जमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रम वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत हाती घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

खालील वृक्ष लागवडीस मान्यता

 1. साग
 2. चंदन
 3. खाया
 4. बांबू
 5. सीताफळ
 6. चिंच
 7. जांभूळ
 8. बाभूळ
 9. शेवगा
 10. आंबा
 11. हादगा
 12. कडीपत्ता
 13. निम
 14. चारोळी
 15. महागोनी
 16. आवळा
 17. हिरडा
 18. बेहडा
 19. अर्जुन
 20. अंजन
 21. बिबा
 22. खैर
 23. काजू (फक्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हासाठी )
 24. फणस
 25. ताड
 26. शिंदी
 27. सुरु
 28. शिवण
 29. महारुख
 30. मंजीयम
 31. मेलिया डूबिया

अर्ज कुठे करावा व निकष काय ? 

 • इच्छुकांनी अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करावा.
                (अर्ज शेवटी लिंक सोबत जोडलेला आहे.)
 •  इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन आसने आवश्यक
          ( जमीन कुळाच्या नावाने असल्यास त्यांची परवानगी )


लाभार्थी प्राध्यानक्रम

 • अनुसुचीत जाती
 • अनुसूचित जमाती
 • भटक्या जमाती
 • निरधीसूचित जमाती (विमुक्त जमाती)
 • दारिद्र रेषेखालील लाभार्थी 
 • स्त्री - कर्ता असलेली कुटुंबे 
 • शारिरीकदृष्टाविकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
 • जमीन सुधारणांचे लाभार्थी 
 • इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी 
 • अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी अधिनियम २००६, खालील लाभार्थी 
                   वरील लाभार्थाना प्राध्यान दिल्यानंतर 
 • अल्पभूधारक शेतकऱ्यांना  लाभ दिल्या जाईल.

वृक्ष लागवडीची कालावधी

१ जून ते ३० नोव्हेंबर

लाभार्थ्यांची जवाबदारी 

 • वृक्ष लागवडीचे व संवर्धन करण्याची जवाबदारी
 • दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष - ९०%
                                             कोरडवाहू वृक्ष - ७५ % झाडे जिवंत ठेवतील फक्त त्याच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचे अनुदान मिळेल.


महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे...

 1. लाभार्थी स्वतः जॉबकार्ड धारक असावा.
 2. जॉब कार्ड धारकाच्या खात्यावर कामाची नोंद करावी.
 3. दर १५दिवसांप्रमाणे मस्टर प्रमाणे मजुरी प्रदान करावी.
 4. संपूर्ण वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी पूर्व हंगामी मशागत कामे, खड्डे खोदणे, वृक्षांची लागवड करणे, पाणी देणे, कीटकनाशके/औषधे फवारणी व झाडांचे सरंक्षण करणे ई. कामे लाभधारकाने स्वतः व जॉब कार्ड धारक मजुरांकडून करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील.
 5. ईतर जॉबकार्ड धरकही काम करू शकतात व त्यांना नरेगाची मजूरी मिळू शकते.
 6. मजुरीची रक्कम फक्त पोस्ट/बँकेमार्फतच दिली जाईल.
 7. ग्रामरोजगार नोंदवहीत व ग्राम मालमत्ता नोंदवहीत सर्व प्रकारच्या नोंदी घेणे आवश्यक आहे.
सदर शासन परिपत्रक नियोजन विभाग (रोह्या प्रभाग) महाराष्ट्र शासनाने दि. १२ एप्रिल २०१८ रोजी काढला असून त्याचा संकेत क्रमांक 201804131143259816 असा आहे.

अधिकृत परिपत्रक व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1Q25qqFzVDJjqkETQneDalj0Pktaxa4Fr/view?usp=sharing

(परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी समस्या आल्यास 7504832020 या  क्रमांकावर संपर्क करावा.)


                                         टीम - प्राकृत फूड्स 

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....