कृषी यांत्रिकीकरण अभियान | krushi yantrikikaran abhiyan | PRAKRUT INFO

 योजनेचे नाव : कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानाचा उद्देश

सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर शेतमजुरांची उपलब्धता नाही, त्यासोबतच लहान शेतकऱ्यांना कृषी मधील अद्यावत यंत्र विकत घेणे शक्य नसल्यामुळे शासनाने हि अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना शेतीमधील अवजारे उपलब्ध करून दिले जातात.

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानात मिळणारे लाभ

सदरील योजनेंतर्गत खालील शेतामध्ये लागणारे यंत्र व कृषी अवजारांसाठी शासनातर्फे अनुदान दिले जाणार आहे.
  1. ट्रॅक्टर
  2. पॉवर टिलर
  3. ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  4. बैल चलित यंत्र/अवजारे
  5. मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  6. प्रक्रिया संच
  7. काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  8. फलोत्पादन यंत्र/अवजारे
  9. वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  10. स्वयं चलित यंत्रे
      

भाडेतत्वावरील सुविधा केंद्र स्थापना

 1. कृषि अवजारे बँकेची स्थापना
 2. उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानासाठी पात्रता

 • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.
 • शेतीचा ७/१२ उतारा व ८ अ असावा
 • शेतकरी जर अनुसूचित जाती किंवा जमाती मधील असल्यास जातीचा दाखला बंधनकारक आहे.
 • फक्त एकाच यंत्र / औजारासाठी अनुदान ज्ञेय असेल.
 • ज्या यंत्र / औजारासाठी लाभ घेतला आहे, त्या घटकासाठी पुढील १० वर्षे लाभ घेता येणार नाही.ट्रक्टरचलित औजार घ्यावयाचे असल्यास, स्वतःच्या किंवा कुटुंबातील व्यक्तीचा नावाने ट्रक्टर असणे बंधनकारक आहे.

    कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानासाठी कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. ७/१२
 3. ८ अ
 4. अनुसूचित जाती / जमित मधून अर्ज करावयाचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
      कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानाच्या ऑनलाईन लॉटरी त निवड झाल्यास
 1. खरेदी करावयाच्या यंत्र / अवजाराचे कोटेशन
 2. खरेदी करावयाचे यंत्र / अवजारचा : केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल
 3. स्वयं घोषणापत्र
 4. पूर्व संमती पत्र

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानासाठी अर्ज कसा करावा

     1. महाडीबीटी च्या संकेतस्थळावर जाऊन त्यात लॉगीन करावे.
     2. संकेतस्थळ : https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
     3. त्यानंतर अर्ज करा या वर क्लिक करून त्यात 
     4. कृषी अभियांत्रीकीकरण उप-अभियान निवडावे.
     5. त्यात आपल्याला आवश्यक यंत्र / अवजार निवडावे.
     6. त्यानंतर २३ रु. इतके शुल्क ऑनलाईन जमा करावे.
     7. लॉटरी लागल्यास महाडीबीटी या संकेतस्थळावर परत जाऊन लॉगीन करावे व त्यात आपल्याला आपली निवड झाली आहे कि नाही हे कळेल.

  कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानाचे परिपत्रक

  krushi yantrikikaran abhiyan gr download

  कृषी यांत्रिकीकरण अभियान | krushi yantrikikaran abhiyan | PRAKRUT INFO