शेतकऱ्यांसाठी गोठा / शेडसाठी योजना

 हरघर गोठे घर घर गोठे योजना

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नवाढीसाठी व ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मित्ती होण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये सामाजिक पायाभूत सोयी-सुविधांच्या माध्यमातून कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करून उपलब्ध करून देणे हाही या योजनेचा उद्देश आहे. सद्यस्थितीत राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध प्रकारची कामे हाती घेण्यात येत असून या माध्यमातून सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेचे निर्माण करण्यात येत आहे.

        सदर उपक्रमातून शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मालमतेचे  निर्माण करण्याबरोबर ग्रामीण भागात रोजगार निर्मित्ती देखील होणार आहे. 

शेतकऱ्यांसाठी गोठा / शेडसाठी योजना


प्रस्तावित कामे

  • गाय म्हैस यांच्याकरिता गोठ्यात पक्के तळ आणि मुत्रसंचय टाकी बांधणे.
  • बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे बांधणे.
  • कुक्कुटपालन शेड (निवारा) बांधणे.
  • शेळीपालन शेड (निवारा) बांधणे.

                                           या उपक्रमा अंतर्गत वरील मालमत्तांची निर्मिती करण्यात येणार आहे.

सदर योजनेतील उपक्रमाद्वारे मागेल त्याला काम मिळेल, लोकांचे स्थलांतरण थांबविले जाईल, शेतकरी स्वावलंबी होईल आणि गावे समृद्धीकडे वाटचाल करतील.

  सदर परिपत्रकान्वये सर्व जिल्हा परिषदांना सूचित करण्यात येते कि, सदर योजने अंतर्गत नियोजन विभागाच्या नमूद सर्व शासन परिपत्रक/शासन निर्णयामधील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून अनुज्ञेय असलेल्या कामांसाठी पुणे जिल्हा परिषद व कोल्हापूर जिल्हा परिषदेप्रमाणे नाविन्य पूर्ण उपकर्म प्रस्तावित करून ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे जेणेकरून शेतकऱ्यांसाठी मालमत्तेचीही निर्मिती होईल.

राबवणारी यंत्रणा :
ग्राम रोजगार सेवक

सदर शासन परिपत्रक ( ग्रामविकास विभाग ) महाराष्ट्र शासनाने दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संकेत क्रमांक 201804131143259816 असा आहे.

अधिकृत परिपत्रक व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1RkOt1Vt9wMCVgQgjpL-q2IBE31128GZt/view?usp=sharing

  1. संदर्भ पत्र : दि. ९ ऑक्टोबर २०१०
  2. दि.१ ऑक्टोबर २०१६
  3. दि. ५ नोव्हेंबर २०१८
  4. दि. ५ ऑगस्ट २०२०
  5. दि. २ ऑक्टोबर २०२०

                                         टीम - प्राकृत फूड्स 

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....