पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना- 2020

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना-  2020  या योजनेतून खाली दिलेल्या कृषी यंत्र/अवजारे  यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.  ट्रॅक्टर  पावर टिलर  ट्रॅक्टर/ पावर टिलर अवजारे  बैलचलित यंत्र / अवजारे  मनुष्य चलित यंत्र  / अवजारे  प्रक्रिया संच / काढणीपश्‍चात तंत्रज्ञान  फलोत्पादन यंत्र व अवजारे  वैशिष्ट्यपूर्ण यंत्र व अवजारे  स्वयंचलित यंत्र भाडेतत्त्वावरील सुविधा केंद्रा    कृषी अवजारे बँकेची स्थापना  उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना  राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना सारांश कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे. उद्देश : जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. धोरण : कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक...

‌‍ऑनलाईन सातबारा / ८ अ आता ग्राह धरणार

 शासन परिपत्रक शासनाच्या महाभूमी पोर्टलवर उपलब्ध होणारे , क्युआर कोड (QR CODE) व १६ अंकी पडताळणी क्रमांक असलेले, डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणकीकृत गा.न.नं. ७/१२, गा.न.नं. ८ अ आणि गा.न.नं. ६ ई. नमुन्यांचा अधिकार विषयक उतारा सर्व कायदेशीर व शासकीय/निमशासकीय कामकाजासाठी वैध राहतील. अशा डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित संगणीकृत गाव नमुना नं.७/१२, गाव नमुना नं.८ अ, आणि गाव नमुना नं. ६ वर तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकारी यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही.                  शासनाचे महाभूमी पोर्टल :                       https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr सदर शासन परिपत्रक ( महसूल व वन विभाग ) महाराष्ट्र शासनाने दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२०११२३१३२२०१६५१९ असा आहे. अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.   https://drive.google.com/file/d/1XF671sr-R03VsZycReZUFsMsW50o-B0N/view?usp=drivesdk   ...

शाळा व वसतिगृहे (आदिवासी विभागाअंतर्गातील ) सुरु करणे बाबत...

                                    राज्यातील आदिवासी विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील विद्यार्थांचे प्रत्यक्ष प्रथम: ई. ९ वी ते १२ वी चे             वर्ग ०१ डिसेंबर, २०२० पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच   ई. ९ वी ते १२ वीच्या या विभागांतर्गत असलेले शासकीय वसतिगृहे  सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.   शाळा व वसतिगृहे सुरु करण्यापूर्वी   आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या बाबत मार्गदर्शक सूचना : हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे. थर्मोमिटर, थर्मल स्कॅनर, प्लस ऑक्सिमीटर, जंतुनाशक साबण, पाणी ई. उपलब्ध करावे. शाळा / वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. शाळा व वसतिगृहातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची दि. २३ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान कोविड १९ साठीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल. वर्गखोली तसेच स्टाफ रूम / वसतिगृहातील खोल्मयांधील बै...

शेतकऱ्यांसाठी गोठा / शेडसाठी योजना

इमेज
  हरघर गोठे घर घर गोठे योजना शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नवाढीसाठी व ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मित्ती होण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये सामाजिक पायाभूत सोयी-सुविधांच्या माध्यमातून कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करून उपलब्ध करून देणे हाही या योजनेचा उद्देश आहे. सद्यस्थितीत राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध प्रकारची कामे हाती घेण्यात येत असून या माध्यमातून सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेचे निर्माण करण्यात येत आहे.         सदर उपक्रमातून शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मालमतेचे  निर्माण करण्याबरोबर ग्रामीण भागात रोजगार निर्मित्ती देखील होणार आहे.  प्रस्तावित कामे गाय म्हैस यांच्याकरिता गोठ्यात पक्के तळ आणि मुत्रसंचय टाकी बांधणे. बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे बांधणे. कुक्कुटपालन शेड (निवारा) बांधणे. शेळीपालन शेड (निवारा) बांधणे.                                            या उपक्रमा अंतर्गत वरील मालमत्तांची निर्मि...

कौमी एकता सप्ताह (१९-२५ नोव्हें 20 ) साजरा करणे बाबत...

                                          कौमी एकता सप्ताह हा देशातील सामाजिक सद्भाव , सुसंवाद, राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी भारतात साजरा केला जातो . भारतात कौमी एकता सप्ताह हा केंद्र शासनाने सन १९८६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार तेंव्हा पासून साजरा केला जातो. सप्ताहाची सुरुवात १९ नोव्हेंबर ला राष्ट्रीय एकात्मता दिवसाला सुरुवात होऊन २५ नोव्हेंबर ला जोपासना दिवसाने समाप्त होतो.  कौमी एकता सप्ताह -२०२० कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाची पार्श्व भूमी लक्षात घेवून लोकसहभागाबाबत योग्य घाबरदारी घेवून खालील प्रमाणे कार्यकर्म आयोजित करण्यात यावेत. १९ नोव्हेंबर (गुरुवार) - राष्ट्रीय एकात्मता दिवस  २० नोव्हेंबर (शुक्रवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस  २१ नोव्हेंबर (शनिवर) - भाषिक सुसंवाद दिवस    २२ नोव्हेंबर (रविवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस  २३ नोव्हेंबर (सोमवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस  २४ नोव्हेंबर (मंगळवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस  २५ नोव्हेंब...

20 ते 24 नोव्हें विदर्भ ,मराठवाडातील काही भागात पावसाची शक्यता... श्री.पंजाब डख

पूर्वकल्पना:- ता. 20 ते 24 दरम्याण विदर्भ ,मराठवाडा तील काही तूरळक भागात  पावसाची शक्यता आहेच  -पंजाब डख श्री.पंजाब डख                         CTC-ATDअंशकालिन शिक्षक 18/11/20 वेळ 1:47 ता .-25 तारखेपासूण राज्यात थंडी वाढेल.   बुलढाणा,औरंगाबाद,जालना,परभणी,नादेंड, अहमदनगर,लातूर,सोलापूर,उस्मानाबाद,बिड, कोल्हापूर,सागंली,पूणे,नाशिक,मुंबई या जिल्हातील तुरळक गावात पाउस अपेक्षित राहील सर्वदूर नसेल .  🟣 माहितीस्तव👇 अरबी समुद्र व बगांल च्या  उपसागरात लहाण मोठी .Cyclone (चक्रीवादळ ) तयार होत आहेत .त्याचा महाराष्ट्रावर परिणाम जास्त पडणार नाही.तर तामीळनाडू,आध्रंप्रदेश,केरळ,कर्नाटक,श्रीलंका,या भागात जास्त प्रभाव राहील.विदर्भ,मराठवाडा,कोकणपटटी मुबंई नाशिक तूरळक काही गावात पाउस अपेक्षित राहील म्हणून शेतकऱ्यांनी सर्तक रहावे.पाउस पडल्या नतंर धूई येते.आपल्या पिकांची. काळजी ध्यावी. कारण यामध्ये धूई/धूके असते त्याचा परिणाम फुलावर होतो . गहू,हरभरा,,पेरणी करण्यास पोषख वातावरण धूई,/धूराळे/धूके पासून पिकांचे सरक्षंण क...

शासकीय योजनांची माहिती थेट व्हाट्सएपवर

 नमस्कार शेतकरी मित्रांनो,               शेतीविषयक शासकीय योजना, शासकीय धोरणे व शासन या विषयात घेत असलेल्या निर्णयांबाबत आपण सर्वसामान्य शेतकरी अनभिज्ञ असतो. त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजना माहिती ही होत नाहीत आणि लाभही मिळत नाही.       हिच शेतकर्यांची समस्या लक्षात घेऊन              प्राकृत फुड्सने हाच शासकिय पातळीवरील व शेतकऱ्यांना मध्ये असलेल्या गॅप भरुन काढून महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.                 आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.    https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1                                   आपला           ...

संत सावता माळी रयत बाजार अभियान

महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चीत करण्यात आलेले आहे.  राज्य शासनाच्या या धोरणांच्या भाग म्हणून संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची सुरुवात करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधीची मूल्यसाखळी संवार्धीत करण्याचे नियोजन आहे.       त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत.       .   बाझारामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव , ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशी संकल्पना राज्यात “संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान” राबवण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत शेतकरी/शेतकरी गट ह्या व्यवस्थेव्दारे थेट ग्रहांकांपर्यंत जोडण्यात येणार आहे.     संबंधित तालुका कृषी अधिकार्यांनी फळे,भाजीपाला व ईतर शेतमाल उत्पादित झाल्यानंतर सबंधित शेतकऱ्यांमध्ये शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी करणे, ग्रेडिंग करणे, पाकिंगकरणे,विक्री व्यवस्थापन ई.बाबत तांत्रिक प्रशिक्षण व क्षमताबांधणी करावी.   ...

शेतकऱ्यांच्या बांधावर व शेत जमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत...

शेतकऱ्यांच्या बांधावर व जमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रम वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत हाती घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. खालील वृक्ष लागवडीस मान्यता साग चंदन खाया बांबू सीताफळ चिंच जांभूळ बाभूळ शेवगा आंबा हादगा कडीपत्ता निम चारोळी महागोनी आवळा हिरडा बेहडा अर्जुन अंजन बिबा खैर काजू (फक्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हासाठी ) फणस ताड शिंदी सुरु शिवण महारुख मंजीयम मेलिया डूबिया अर्ज कुठे करावा व निकष काय ?   इच्छुकांनी अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करावा.                 (अर्ज शेवटी लिंक सोबत जोडलेला आहे.)  इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन आसने आवश्यक           ( जमीन कुळाच्या नावाने असल्यास त्यांची परवानगी ) लाभार्थी प्राध्यानक्रम अनुसुचीत जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती निरधीसूचित जमाती (विमुक्त जमाती) दारिद्र रेषेखालील लाभार्थी  स्त्री - कर्ता असलेली कुटुंबे  शारिरीकदृष्टाविकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे जमीन सुधारणांचे लाभार्थी  इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी  अनुसूचित जमाती ...

अर्थचक्रास चालना देण्यासाठी राजकोषीय उपाययोजना

 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या कोविड-१९ महामारीच्या काळातील लॉकडाऊनमुळे सन २०-२१ च्या अर्थ संकल्पीय अंदाजानुसार महसूल प्राप्त होत नसल्याने तसेच, या महामारीच्या काळात आरोग्य, पोलीस प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा सुरळीत ठेवणे, ई.तातडीच्या बाबींसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने सरसकट सर्व विभाग व सर्वच बाबींसाठी निधी वितरीत करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत दरमहाचा महसुली जमेचा कल व बांधील खर्चासाठी आवश्यक निधी यांचा आढावा घेवून निधी वितरणाचा निर्णय घेणे भाग पडत आहे. सध्याच्या महामारीच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेस उभारी देण्यासाठी विविध उपाय योजना केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत केल्या जात आहेत. उपरोक्त परिस्थितीत राज्याच्या आर्थिक स्थितीस चालना देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्मंत्री व मंत्रिमंडळातीलइतर सदस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. सदर चर्चेतील निर्णयास अनुसरून राज्यातील रोजगार निर्मितीस चालना देणे व अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी दूरगामी उपाययोजना म्हणून पुढील बाबींना शासन मान्यता देण्यात ...

विकेल ते पिकेल अभियान राज्यात राबविण्याबाबत

माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेवर आधारित विकेल ते पिकेल अभियान कृषी व संलग्न विभागामार्फत राज्यात राबविण्याबाबत...                                                                                   शेतमालाच्या उत्पादकाला व ग्राहकाला काय हवे आहे याचा शोध घेऊन त्यानुसार पीक पद्धती, कृषी प्रक्रिया, पुरवठा साखळी व  विक्री व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना विकेल ते पिकेल हे अभियान मदत करेल. उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्री साखळ्या आणि  कृषी आधारित उद्योजकांच्या माध्यमातून नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा आणि जोखीम निवारा क्षमता विकसित करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या संबंधित योजनाद्वारे गुंतवणूक केली जाईल. त्यासाठी पीकनिहाय विविध मूल्य साखळी प्रकल्प ...

रात्री पासून राज्यात थंडीची लाट - पंजाब डख

 ता . 14,15, दिवाळी च्या वेळेस अंशता ढगाळ वातावरण राहील.   उत्तरे कड़ील वारे वाहत असल्यामुळे राज्यात आज रात्री पासून  थंडी वाढणार आहे .  आपल्या पिकांची काळजी ध्यावी. कारण यामध्ये धूई/धूके असते त्याचा परिणाम फुलावर होतो .   गहू,हरभरा,पेरणी करण्यास पोषख वातावरण धूई/धूराळे/धूके पासून पिकांचे सरक्षंण करा .                                        🟣 माहितीस्तव👇   वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .  दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे . शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.  पंजाब डख हवामान अभ्यासक रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य गुगळी धामणगाव ता.सेलू जि.परभणी (मराठवाडा ) 06/11/2020  ------------- टीम – प्राकृत फूड्स--------------------  महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थे...

दीपावली उत्सव मार्गदर्शक सूचना – २०२०

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दीपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.              त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. .        राज्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. मागील सात आठ महिन्यांत ज्या पद्धतिने सर्व धर्मीय सण/ उत्सव साध्या पद्धतिने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले. त्याच प्रमाणे वर्षीचा दीपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमानेच पूर्ण घबरदारी घेवून अत्यंत साध्या पद्धतिने साजरा करावा. .        या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम/कार्यक्रम उदा. दीपावली पहाट आयोजित करण्यात येवू नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास आनलाईन,केबल नेटवर्क, फेसबुक ई. माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे. .         सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राध्यान देण्यात या...