होळी धुलीवंदन व रंगपंचमी 2021 मार्गदर्शक सूचना | holi dhulivandan v rangpachmi margdarshak suchna 2021 | PRAKRUT INFO
राज्यात यावर्षी सर्वधर्मीय सण व उत्सव मोठ्या स्वरूपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये कोविड १९ रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोविड१९ चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित न येता उत्सव साजरा करणे उचित होणार आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी होळी धुलीवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. होळी धुलीवंदन व रंगपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठा प्रमाणावर साजरा केला जातो. होळी - दिनांक 28 मार्च 2021 रोजी धुलीवंदन - दिनांक 19 मार्च 2019 रोजी रंगपंचमी - दि. 2 एप्रिल 2019 रोजी साजरी करण्यात येणार आहे. दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकून एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. परंतु co...